पान:Sanskruti1 cropped.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सल्लागारसुद्धा म्हणतात. आणखी एका स्पष्टीकरणानुसार कुंती चुकून 'भिक्षा पाचजणांत वाटून घ्या' म्हणाली म्हणून पाच पांडवांनी तिच्याशी लग्न केले. तिस-या स्पष्टीकरणाप्रमाणे आधल्या जन्मी द्रौपदीने तप केले, त्या वेळी तिला शंकराचे 'पुढच्या जन्मी तुला पाच पती मिळतील', असे वरदान मिळाले होते. लोककथेप्रमाणे द्रौपदी एका पतीकडून दुस-या पतीकडे जाताना अग्निप्रवेश करून शुद्ध होऊन जात असे. अशा नानाविध कथा आहेत. पैकी महाभारत हा इतिहास ग्रंथ आहे, म्हणून तेथे अडचण पडत नाही. पहिले स्पष्टीकरण ऐतिहासिक वाटते. ते मूळ सूतकथेचा भाग वाटते. उरलेली स्पष्टीकरणे या घटनेच्या विलक्षणपणाच्या समर्थनाचा वाटतात. रामायणातील अडचण या मार्गाने सुटत नाही. रामायणाप्रमाणे पाहता कैकेयीशी लग्न करितानाच 'तुझ्या पुत्राला ना राज्य देईन', असे दशरथाने विवाहप्रसंगी कबूल केल्याचे दिसते. त्या दृष्टी" युवराज आरंभापासून भरतच होता. कैकेयीच्या नातलगांनी अयोध्येचे राज्य अनेक पदाधिकारांवर स्वतः बसून व्यापिलेले होते. कामलंपट असा दरा कैकेयीच्या पूर्णपणे कह्यात होता. या दशरथाने भरत आजोळी आहे, संधी साधून कैकेयीलाही नकळत रामाला युवराज करण्याचा घाट घा" आणि या योजनेत राम सामील झाला, असे रामायणातील काही वचनाव" वाटते. आपल्याला राज्य मिळण्याच्या ऐवजी वनवासात जावे लाग' यामुळे राम बापावर रागावलेला होता, असाही उल्लेख आहे. आप माघारी कैकेयी पित्याची हत्या करील, याची रामाला भीती वाटत हो। असेही उल्लेख आहेत. मूळचे कुशीलवांचे कथानक या उल्लेखांशी सु" असणारे होते. उत्तरकालीन प्रक्षेपांनी रामाचे उदात्तीकरण वाढविल असे म्हणावे काय? असे म्हणावयाचे, म्हणजे रामायणकथेतील " । उदात्तपणा खच्चीच करणे आहे. आणि भरताचा अलौकिक, दिव्य त्याग निरर्थक ठरविणे आहे. सामान्य लोकसमजुतीच्या विरुद्ध असणारी माहि मूळ ग्रंथातील इतिहासाचा भाग असते, उरलेले प्रक्षेप उत्तरकालीन समजुतीचा भाग असतात, या सूत्रावर पुराणांचे विविध प्रकारांनी परीक्षण केले जात १७८ ।। संस्कृती ।।