पान:Sanskruti1 cropped.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साक्षी आहे; तसे वाल्मीकीचे नाही. एकदा उत्तरकांड प्रक्षिप्त मानिल्यानंतर वाल्मीकी हाच एक कुशीलव होतो. तसे इरावतीबाईंनी म्हटलेही आहे. नारदाच्या सांगण्यावरून तो रामकथेवर काव्य करितो, यापलीकडे रामकथेचा वाल्मीकीशी संबंध नाही. बाईंची आणखी एक कल्पना विवाद्य म्हटली पाहिजे. त्या असे म्हणतात की, कदाचित मुळात रामायणकथा ही साध्वी सीतेची कथा असेल. या त्यांच्या मताची उभारणी ‘शोकः श्लोकत्वम् आगतः कल्पनेवर या झालेली आहे. क्रौंचपक्ष्याचा शोक पाहून वाल्मीकींचे हृदय द्रवले. त्यांच्या तोंडातून जी शापवाणी बाहेर पडली, ती श्लोकबद्ध होती. अशा रितीने शोक श्लोकत्वाला प्राप्त झाला. शोक हा या काव्याचा मूळ जन्म. कदाचित सीतेने भूमिप्रवेश केला, रामाने भावांसहित शरयूत देहत्याग केला, ही शोकाची बाब रचनाकाळी प्रमुख असेल. असे असेल, तर मूळ रामायणकथा एका साध्वी पतिव्रतेच्या दुःखाची व तिच्या पावित्र्यासमोर सर्वांनी नतमस्तक होण्याची कथा असेल, अशी बांईची कल्पना आहे. याही कल्पनेत पुरावा सामावण्याजोगा नाही. मूळच्या रामायणकथेत जर उत्तरकांड प्रक्षिप्त असेल, तर सीतायाम नाह, सीतेचे लंकेतील अग्निदिव्य नाही, अयोध्येतील भूमिप्रवेश नाही; आणि जर वाल्मीकी कुशीलव म्हटला व रामाच्या पुत्रांनी. रामासमोर काव्यगाय? करण्याची कल्पना प्रक्षिप्त मानिली, तर मूळ रामायण ही रामाच्या राज्याभिषेकावर येऊन संपणारी एक साधीसुधी. जयकथा आहे, असे म्हणावे लागते. या पलिकडे तीत. शोक शिल्लक राहत नाही. व्यासांनी गणपतीला लेख म्हणून बोलविल्याची कथा ही जशी प्रक्षिप्त आहेत्याचप्रमाणे वाल्मीकीचा शोक श्लोकत्व पावल्याची कल्पना उत्तरकालीन आहेअनुष्टुभ् हा अतिप्राचीन कुंद असन हा छंद वैदिक काळातही होता. वीणेच्या तालावर छंदोबद्ध गीत गाण्याची परंपरा वैदिक काळापांसून आहेवाल्मीकीला आदिकवी करण्यासाठी कुणीतरी त्याला अनुष्टुभाचा छंदनिर्माताही केले आहे. इतकाच याचा अर्थ या सर्व विवेचनाचा अर्थ बाईंचे रामायणावरील लिखाण अगदीच बाया गेले, असा नाही. महाभारतावरील लिखाणात जो पक्केपणा आहे. तो येथे नाहीइतकाच या विवेचनाचा अंर्थ. पण बांई कशावरही लिहीत असल्या, , तरी त्यात मार्मिक कल्पना असतातच. नकळत हात पालापाचोळ्यात त्यांचा । संस्कृती ।। १७६