पान:Sanskruti1 cropped.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मूळची रामायणकथा महाभारतापेक्षा जुनी असावी, असा एकदा ग्रह करून घेतला, म्हणजे त्या ग्रहाच्या पोटी नवीन मते उदयाला येऊ लागतात. महाभारतातील अरण्यपर्वात आढळणारी रामकथा ही खरोखरी सूतांनी संग्रहीत केलेली रामकथा नव्हे. ज्याप्रमाणे महाभारतात प्राचीन आख्याने संग्रहीत झालेली आहेत, तसे रामायण कथेचे नाही. महाभारतातील रामायण कथा ही वाल्मीकि रामायणाच्या आधारे संक्षिप्त करून घेतलेली आहे. याबाबतचे तपशीलवार विवेचन डॉ. सुखटणकरांनी पूर्वीच करून ठेविलेले होते, पण ते इरावतीबाईंना पटले नाही. मूळ महाभारतातील रामकथेत रामायणातील श्लोक नंतर कुणीतरी प्रक्षिप्त केले असावेत, असे मत त्यांनी दिलेले आहे, हे मानण्याला कारण काहीच नाही. रामायणाच्या काळी अयोध्या प्रसिद्ध होती. 'अयोध्या' हे नाव मागे पडले आणि नंतर 'साकेत' हे नाव रूढ झाले, असे बाईंना वाटते. या नावाचा उल्लेख प्राचीन बौद्ध वाङ्मयात आहे. बुद्धाचे शाक्यकुल हा अयोध्येच्या कोसल-कुलाचाच एक भाग होता. रामाला बौद्धांनी बुद्धांचा पूर्वावतार म्हणून मान्यताही दिली आहे. बौद्ध वाङ्मयात उल्लेखिलेले 'साकेत' हे नाव अयोध्या या नावापेक्षा जुने आहे, असे मानिता आले नाही, तरी ते नवे नव्हे तर समकालीन आहे. दोन्ही महाकाव्यांशी कत्र्यांचा संबंध आहे, ही कल्पना अशीच रामायणकथेच्या जुनेपणावर आधारलेली आहे. बाई म्हणतात, कवीचा कथानकाशी निकट संबंध दोन्ही महाकाव्यांत दिसतो. बाईंचे हे म्हणणे मान्य करणे फार कठीण आहे. महाभारत ही व्यासांच्या आईच्या दुस-या वंशाची गोष्ट आहे. लोकभाषेत सांगावयाचे, तर विचित्रवीर्य आणि चित्रांगद हे व्यासांचे सावत्र भाऊ होते, आणि धृतराष्ट्र आणि पांडू हे तर व्यासांचे स्वतःचेच नियोगज पुत्र होते. यथपासून व्यासांचा संबंध या कथेशी येतो. शेवटी कृष्णाच्या मृत्युनंतर तुमचे काम संपले आहे; तुम्ही राज्यत्याग करून वनवासात जा', हा सल्लाही व्यासच देतात. शिवाय, व्यासांचा शिष्य जैमिनी याचीही एक स्वतंत्र भारतकथा असल्याची परंपरा आहे. त्याचा शिष्य वैशंपायन जनमेजयाला ही कथा सांगतो. भारताचा लेखक व्यास हा महाभारत-कथेला उपरा नाही. गणपती लेखक बनल्याची कथा उपरी असली, तरी व्यांस हा कथेचा एक १७५ ।। संस्कृती ।।