पान:Sanskruti1 cropped.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चिकित्सित आवृत्ती पाहिली व तीत उत्तरकांड प्रक्षिप्त असल्यामुळे रामाचा सीतात्याग, सीतेचे अग्निदिव्य हा युद्धकांडातील व उत्तरकांडातील भाग गळलेला दिसला, तेव्हा त्यांना धक्का बसला. उत्तरकांड जर प्रक्षिप्त असेल, तर सीतात्यागही प्रक्षिप्त आहे, त्याच्याशी निगडीत असणारा युद्धकांडाचा भागही प्रक्षिप्त म्हणावयाचा आहे, ही गोष्ट अगदी उघड होती. पण जर हा सगळा भाग प्रक्षिप्त म्हणावयाचा असेल, तर पतीबरोबर वनवासात जाणे यापलीकडे सीतेत काही शिल्लक राहत नाही. आणि पतीबरोबर वनवासात गेलेल्या स्त्रिया थोड्या नाहीतः द्रौपदी आहे, दमयंतीही आहे. उत्तरका प्रक्षिप्त ठरले, म्हणजे सीतेच्या प्रतिमेलाच तडा जातो, ही गोष्ट बाईंना फार उशिरा जाणवलेली दिसते. तरीही उत्तरकांड प्रक्षिप्त असल्याचे त्यांना आधीपासून माहिती होतेच. | सनातनी हिंदू मनात रामकथा केव्हातरी प्राचीनकाळची आहे, ही गोष्ट मोठी मूळ धरून बसलेली आहे. जो माणूस जुना असेल, त्याविषयी कथाही जुनीच असली पाहिजे, अशी कोणतीतरी चमत्कारिक समजूत या जाणिवेच्या बुडाशी असलेली दिसते. विशाखदत्ताचा चंद्रगुप्त कालिदासाच्या अग्निमित्रापेक्षा जुना आहे. पण कथा जुनी असली तरी ती सागणी" विशाखदत्त हा मात्र कालिदासापेक्षा जुना नसतो. हिंदूंच्या परंपरागत कथा सर्व भांडार सूतांनी संग्रहीत केलेले आहे. कुशीलवांचा आढळ सूतांच्याइत" जुन्या काळात होत नाही. काव्याचे गायन करणारे म्हणून कधी स्वतंत्र करणारे कुशीलव यांचे उल्लेख आढळतात, तर कधी नाटक-कपना कुशल वादक म्हणून, गायक म्हणून त्यांचा उल्लेख आढळतो. हे सग उल्लेख कौटिल्य, वात्स्यायन, भरतनाट्यशास्त्र यांच्या ग्रंथात आढD" प्राचीन ग्रंथांना ज्याप्रमाणे सूतांचे महत्त्व जाणवते, तसे कुशीलवांचे जा नाही. त्रयीचा विचार करीत असताना कौटिल्य हा वेद इतिहास " पुराणे ह्यांचा उल्लेख करितो. सूतांचे वाड़मय पाचवा वेद म्हणून धर्मवा" कौटिल्याच्या पूर्वीच जाऊन बसलेले होते. पण कौटिल्य कुशीलवांचा उ नट, नर्तक, गायक यांच्याबरोबर करितो. त्यांच्या वाड़मयाला करमणु जास्त महत्त्व तो देत नाही. रामायणकथा ही कुशीलवांनी संग्रहीत करा कथा आहे. ती सतसंग्रहीत कथा नाही. महाभारतातसद्धा ही कथा माकड सांगितलेली आहे. १७४ । संस्कृती ।।