पान:Sanskruti1 cropped.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिच्या मदतीने होते. शिवाय, ही देवता पुत्रदात्री आहे. प्रेताचे दहन करून आलेल्याचे आशिव नष्ट करणारी आहे; व जर हनुमंत हा शब्द ‘येनमन्ते’ पासून आला असेल, तर ही मुळात दक्षिणेची स्वयंभू प्रतिष्ठा असलेली देवता नंतर केव्हातरी रामायणात समाविष्ट झालेली दिसते. आहे या स्वरुपातील रामायणातसुद्धा हनुमंताला फार मोठे महत्त्व मिळालेले नाही. तो फक्त सुग्रीवाचा दूत आहे. मूळ रामायण कथेप्रमाणे सीताशोधाची जबाबदारीही त्याच्यावर टाकलेली नाही; ती सुग्रीवावर टाकिलेली आहे. सुग्रीवाने सांगितल्यावरून अंगदाच्या नेतृत्त्वाने जी मंडळी निघाली, तीत हनुमंत एक आहे. अंगदाच्या सूचनेप्रमाणे तो लंकेकडे उड्डाण करीतो. रामायणाला रामकथेत हनुमंताचे जे महत्त्व आजच्या लोकपरंपरेला जाणवते, तसे वाल्मीकीच्या काळी जाणवलेले दिसत नाही. हिंडूच्या परंपरेत महाभारत कथा जशी प्राचीन आहे, तसे रामायणकथेचे नाही. हिंदू कथेपेक्षा निराळ्या पद्धतीने जर भारतकथा आली, तर ती इतर सांप्रदायिकांनी मुद्दाम विकृत केली आहे, असे म्हणता येते. आणि मुळापासूनच पांडवांच्या कथेत कृष्ण आणि दुर्योधन यांचे महत्त्व आहे. रामायणकथा यापेक्षा निराळी आहे. उत्तरकांड व बालकांड पुष्कळसे प्रक्षिप्त, प्राचीन हिंडूची कथा नसल्यामुळे बौद्ध परंपरा. जैनं परंपरा आणि हिंदू परंपरां यां एकत्र करून हिंडूची परंपरा समृद्ध झाली आहे. असे मानण्यास जागजागी आधार, मूळ रामकथेत रावण आणि हनुमंत हेच उपरे असण्याचा फार मोठा संभव, हे लक्षात घेतले. तर महाभारतापेक्षा रामायणकथा अधिल विस्कळीत आहे असे मी का म्हणतो. हे कळणे सोपे जाईल. महाभारताचा विस्कळीतपणां हजारो वर्षे स्थिरपणे अस्ताव्यस्त स्वरूपात उपलब्ध असणांच्या ग्रंथाचा विस्कळीतपणा आहे. रामायणातील विस्कळीतपणा हा मुळात कथेतच अनपेक्षित सांधेजोड गाभ्यातच असलेला . असल्यामुळे विस्कळीतपणा आहे रामायणाविषयी इरावतीबाईंनी जे लिहिले आहे. ते महाभारताप्रमाणे या कथेचे दीर्घ चिंतन त्यांनी केले नव्हते, ही गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवत राहते: उत्तरकांड प्रक्षिप्त आहे, ही कल्पना त्यांना यापूर्वीच याकोबीने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीच माहीत असावयाला हरकत नव्हती. उत्तरकांड प्रक्षिप्त असल्याचे नोंदविलेले होते. भारतातील रामोपाख्यानात उत्तरकांडाचा कथाभाग नाहीच. तरीही ज्या वेळी त्यांनी रामायणाची तथाकथित १७३ । संस्कृती ।