पान:Sanskruti1 cropped.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मणांच्या सेवेत होते, वैश्यांकडे होते. गणिका, नर्तकी, कलावंत यातही क्रितदास होते. हा गुलामांचा वर्ग म्हणजे वरिष्ठ वर्णांची सेवा करणारा पण अनुत्पादक वर्ग होता. हा वर्गही स्मृतिकारांनी 'शूद्र' म्हणून घेतलेला आहे. तिन्ही वर्णाची सेवा करणे हा जेव्हा 'शूद्र' या शब्दाचा अर्थ असतो, त्यावेळी तो शूद्र अनुत्पादक असा परिचारक आहे. ज्या वेळी सर्व धंदेवाले शूद्र म्हणून ओळखले जातात, त्यावेळी तो उत्पादक असा प्रामुख्याने शेतकरी असणारा, पण इतरही छोटेमोठे धंदे करणारा असा बहुजनसमाज आहे. यांखेरीज ऋतिदासांच्या सेना होत्या. म्हणजे शूद्रांना लढण्याचेही काम करावे लागत होते, असे दिसते. दासांच्यामधून सैनिक केला गेलेला हा वर्ग म्हणजे शूद्राचा तिसरा थर आहे. पुराणे आणि स्मृती हे सारे गृहित करून सुव्यवस्थित पणन कधीच करीत नाहीत. कारण तत्कालीन ब्राह्मणांना समाजाचे पूर्ण चित्र व्यवस्थितपणे सांगण्याची गरज वाटलीच असेल, असे नाही. । पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रैवर्णियांकडून पुढेच गेले पाहिजे, असे हा; तेथून मागेही जाता येईल. आणि मागे जावयाचे, जर लढणारे ब्राह्मण १ अध्यात्मतत्त्वज्ञानाची चर्चा करणारे क्षत्रिय असा एक प्रकार आपल्याला दिसतो. जनक, जनश्रुती, भीष्म हे असे क्षत्रिय आहेत. द्रोण, कृप, परशुराम यादा तसे ब्राह्मण आहेत. आदिवासी समाजात जो Priest King आपल्याला दिसतो. तेथपर्यंत नेणारा हा दुवा आहे. मंत्रवेत्ते, लढवय्ये आणि यज्ञयाग करणारे हा ब्रह्मक्षत्रियांचा एक गट आणि शेती करणारे, धंदे करणारे, कर र हा वैश्यांचा दुसरा गट, अशा व्दैवर्णिक रचनेपर्यंत आपण मागे जातो. जाऊन पहावयाचे, म्हणजे पशुपालन करणारे आणि लढणारे भटके अवर्ण लोक आहेत. पशुपालनाच्या अवस्थेतील एकवर्णीय समाज पुढे शेतीला न झाल्यावर स्थिर वसाहतीत व्दैवर्णिक होता. नंतर मंत्रवेत्ते व राजे हा " पडून तीन वर्ण होतात. शेवटी व्यापारी व धंदेवाला हा तुकडा पडून |" होतात. हे वर्णव्यवस्थेचे स्थल विकासक्रमाचे रूप उपलब्ध असलेल्या शव पुराव्यांच्या आधारे मांडिले पाहिजे, आणि ते मांडिताना ही नेहमीच "शाचा काल्पनिक विभागणी आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे. 'विश' १६९ ।। संस्कृती ।।