पान:Sanskruti1 cropped.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुळात वेदही तीनच मानिले गेले. त्यापैकी यजुर्वेद हा क्षत्रियांचा वेद, सामवेद हा ब्राह्मणांचा वेद आणि ऋग्वेद हा वैश्यांचा वेद मानिला गेला. भगवद्गीतेत सर्व वेदांत सामवेद श्रेष्ठ असल्याचा जो उल्लेख येतो. त्यात प्राचीन काळाची समजूत गृहीत आहे, असे सर्वांचे मत आहे. गुणही जुन्या काळी तीनच मानले गेले. त्यांपैकी सत्त्व हा ब्राह्मणांचा गुण, रजस् हा क्षत्रियांचा गुण यांचे उल्लेख आहेत. तमस् हा वैश्यांचा गुण असे अनुमान करिता येईल. कोण एके काळी भारतीय आर्यांचा समाज फक्त तीन वर्षांचा होता, ही कल्पना समाजशास्त्राला धरून असल्यामुळे महत्त्वाची आहे. प्राथमिक समाजात समृद्ध असा व्यापारी वर्ग आरंभीच्या काळात असू शकत नाही. म्हणून जो शेती, पशुपालन करितो, नानाविध उद्योगधंदे करितो, असा एक सर्वसाधारण वर्ग जर गृहीत केला, तर आरंभीतरी समृद्ध व्यापारी त्या समाजात असण्याचे कारण नाही. प्रदेशवाचक 'विश्’ शब्द आणि राजाचे 'विशांपती' हे विशेषण आपल्याला याच ठिकाणाकडे घेऊन जाते. - म्हणजे कोणे एके काळी समाज तीन वर्षांचा होता; या तिन्ही वर्णाना पदाचा अधिकार होता; आणि तिन्ही वर्ण आर्यांचेच होते, असे म्हणावे लागल. या ठिकाणापासून मागे आणि पुढे असा दुहेरी प्रवास महत्त्वाचा जाह. त्रैवर्णिक समाजाच्या पुढे जावयाचे, तर 'शूद्र कोण?' हा प्रश्न उपस्थित होतो. या मुद्यावर पुराणे आणि स्मृतिग्रंथ यांची भूमिका अस्पष्ट जाह. कुंभार, लोहार, सोनार, सुतार, शिंपी, धोबी, रंगारी असे विविध धंदे णारे लोक शूद्र म्हणून गणावयाचे, ही एक परंपरा आहे. शूद्रांची ही ल्पना म्हणजे पुन्हा वैश्यांचीच कल्पना. भटकेपणा सोडून समाज स्थिरावत असताना आद्य काळात जे शेती, पशुपालन आणि वाणिज्य करणारे वैश्य ९त, ते स्थिर समाजाच्या विकासानंतर दोन गटांत विभागलेले दिसतात. का एक गट पूर्वीप्रमाणे वैश्य मानिला गेला. तो समृद्ध गट, या गटाचा तुकडा पुढे शूद्र मानिला गेला, असे दिसते. ही विभागणी नीट समजण्यासाठी " काही दुवे विचारात घेतले पाहिजेत. त्यांतला एक दुवा वाणिज्य हा आहे. आद्य शेतीप्रधान समाजात विकेंद्रीत उत्पादनपद्धती असते. अशा १६७ || संस्कृती ।।