पान:Sanskruti1 cropped.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारतात पडलेली भर, गुप्तकाळापूर्वी भृगूनी आणि शैव-वैष्णव संप्रदायांनी महाभारतात टाकलेली भर, सफाईने बाजूला काढीत इ. सनाच्या पूर्वी, भासाच्या पूर्वी महाभारताचे जे रूप अस्तित्वात असेल, त्याची कल्पनेने ओळख करून घ्यावी लागते. महाभारतकालीन समाज, म्हणजे या कल्पनेतल्या महाभारतात जाणवणारा समाज; लिखित चिकित्सित आवृत्तीत म्हणजे आठव्या-नवव्या शतकात जाणवणारा समाज हे महाभारताचे खरे रूप नव्हे. | इरावतीबाईंना भारतीय समाज आणि महाभारतात असणारा एका युगाचा अत सांगताना हे भान नेहमीच राहिलेले आहे, असे नाही. त्या पुनःपुन्हा गुप्तकालीन महाभारताच्या घटना 'युगान्त' चे चित्रण करण्यासाठी म्हणून वापरतात. महाभारतात जे युग संपलेले आहे ते बुद्धपूर्व युग आहे, बुद्धोत्तर युग नाही. चिकित्सित आवृत्तीच्या आधारे बाईंनी जो समाज रंगविलेला आहे, त्याचे चित्र मोठ्या प्रमाणात गुप्तकालीन समाजाशी मिळते जुळते असे आहे. बुद्ध पूर्वकालीन समाजाचे दर्शन घेण्याला हे त्यांचे विवेचन फारसे उपयोगाचे नाही. पण या विवेचनात त्यांनी नोंदविलेल्या दोनतीन बाबी विचारात घेण्याजोग्या आहेत. बाई म्हणतात, "स्त्रीवर बलात्कार झाला, तर पूवीच क्षत्रिय तिला टाकून देत नसत." (युगान्त, पृ. २४९) बाईनी हे मत कशाच्या आधारे दिले, हे मला पामराला तर समजणे शक्यच नाही, पण या क्षेत्रातील कोणत्याही तज्ज्ञाला ते समजेल, असे वाटत नाही. कारण भारतीय पाड़मयात बलात्कारकथा नाहीतच. उतथ्य ममतेशी समागम मागतो; पण | वलात्कार नव्हे. कारण ममतेलाही त्याचा संग मागण्याचा अधिकार जातात. त्या कमारिका असतील, "प आहे. वेळोवेळी बायका पळविल्या जातात. त्या कुमारिका असतील, 7 पळविणारे त्यांच्याशी लग्ने करितात. हा बलात्कार नव्हे. त्या विवाहित | ल तर, भ्रष्ट होण्यापूर्वी सुटतात. येऊन जाऊन बलात्कार उदाहरण महाभारतात उपरिचर वसूच्या कथेच्या निमित्ताने आलेले | ती कथा उघड रूपकात्मक आहे. उलट अंबेची कथा मात्र असे सांगते की, पळविली गेलेली स्त्री जरी शुद्ध असली, तर जात नसे. १६५ । संस्कृती ||