पान:Sanskruti1 cropped.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्णाचे तेज अधिकच दिव्य झाले होते. इरावतीबाईंनी कर्णाच्या मूर्तीतील सगळे प्राणतत्त्व हिरावून घेतलेले आहे. इरावतीबाईंच्या दिशेने कर्ण या व्यक्तिरेखेचा अतिशय तपशीलवार विचार प्राचार्य अ. दा. आठवले यांनी केला आहे. त्यामुळे त्याचा पुन्हा अनुवाद करण्याची गरज नाही. त्या मानाने भीष्माविषयीचे बाईंचे विवेचन सर्वस्वी नवे आहे. आजतागायत या संदर्भात भीष्माचा विचार कुणी केला नव्हता; आणि बाईंनी तो विचार केला आहे. त्या विचाराचा मार्मिकपणा आणि चपखलपणा इतका मोठा आहे की, एकदा भीष्म या व्यक्तिरेखेचे बाईंचे स्पष्टीकरण वाचल्यानंतर पुन्हा दुसरे काही वाचावे, असे वाटत नाही. सर्वांच्याच समोर भीष्म हा प्रश्नचिन्ह म्हणून उभा असतो. भीष्माने पित्याचे सत्यवतीशी लग्न व्हावे, *णून बह्मचर्य पत्करले. गादीचा हक्क सोडला, त्याचवेळी भीष्माला राज्यही सोडता आले असते, पण कुरुवंशाच्या राज्यरक्षणाची जिद्द मात्र भीष्म सोडू शकला नाही. सत्यवतीशी पित्याचे लग्न लावून दिल्यानंतर पनात जावयाला भीष्माला हरकत नव्हती. सत्यवतीची मुले लहान असोत, नाडा असोत, राज्य त्याचे नव्हते. त्याचा त्या राज्याशी संबंध नव्हता. शंतनु पारल्याचे निमित्त करून राज्यरक्षणासाठी भीष्म पुन्हा थांबला. विचित्रवीर्याचे लग्न झाल्यानंतर भीष्माला वनात जाता आले असते. पण तो पुन्हा थांबला. ईला गादीवर बसविल्यानंतर तो वनात जाऊ शकला असता; पण तरीही नाम थांबला. निदान कौरव-पांडवांमध्ये जेव्हा राज्याची वाटणी झाली, हा अंबा-अंबिका आणि सत्यवती वनात गेल्या, तेव्हा त्यांच्याबरोबर भीष्म रात जाऊ शकला असता. तेही घडले नाही. राज्य सोडून वनात जाणे झाला जमलेच नाही. त्याला राज्यलोभ नव्हता, सत्ता गाजविण्याची "९पिकाक्षा नव्हती, सुखाचा मोह नव्हता; दाहक पराक्रम आणि दाहक ग्य या तळपत्या सूत्रांनीच भीष्माच्या जीवनाचे वस्त्र घट्टपणे विणलेले होते. त्यात तडजोडीला जागा नव्हती. तरीही भीष्म राज्य मात्र सोडू शकला नाही. हस्तिनापूरच्या राज्यात राहिलेला भीष्म त्याला जे न्याय्य वाटत होते, जे उचित वाटत होते. त्याचेतरी संरक्षण करू शकला काय? १६३ । संस्कृती ।।