पान:Sanskruti1 cropped.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भोवती घोटाळत होते, जिच्यावर आपले जिवापाड प्रेम असावे, ती स्त्री आपली नाही, हे भीमाचे दुसरे दुर्दैव होते. मृत्युच्या सीमेवर फक्त भीमच खुरडत खुरडत द्रौपदीकडे आला. त्यावेळी द्रौपदी अर्जुनाच्या चिंतनात गढलेली होती. आपली नित्य काळजी वाहणारा प्रेमळ भीम आपला भाऊ असावा, असे जर द्रौपदीला या शेवटच्या प्रसंगी वाटले, तर तो भीमाच्या दुदैवाचा कळस होता. या संदर्भात मी तो अर्थ लाविलेला होता. आपली काळजी घेण्यास मात्र प्रतिक्षणी भीम हवा, आणि प्रेमासाठी अर्जुन हवा, ही द्रौपदीची इच्छा मला भीमाच्या बाजूने विलक्षण करुण वाटली. बाईंना मात्र असल्या प्रकारचे विषारी दुःख फारसे आवडत नव्हते. त्यांनी मृत्युच्या सीमेवर शेवटी धर्मविदुरांची भेट घातली आहे. गांधारी-धृतराष्ट्रांचा समझोता. करून दिला आहे. भीमाला एक नवा विजय दिला आहे. ( ललितकथेचे शेवट कसे करावयाचे, यावर फारसा वाद करण्याचे कारण नाही. तरीही महाभारत हा बाईंचा जीवनसाथी होता, रामायणाचे तितकेही स्थान त्यांच्या जीवनात नव्हते. रामायण हे त्यांच्यासाठी हातात न सापडणारे स्वप्न होते. रामायणातील सीता रामाने त्यागिली असेल, तर तो बाईंच्या रागाचा विषय असावा, यात नवल काहीच नाही. पण ही सीता-रामाने त्यागिली नसेल, तरी बाईंचा स्वप्नभंग होत होता. रामायणावरचे त्यांचे लिखाण तर महाभारतापेक्षाही तुटक आहे. महाभारतातील विशाल पात्रसृष्टीपैकी अवघ्या नवांवर त्यांनी लिहिले आहे. त्यात बाईंचे मन ज्या नायकाभोवती घाटाळत होते, तो नायक अर्जुन नाही. ज्या खलनायकाने महाभारत घडविले, तो दुर्योधन नाही. महाभारत हा केवळ कौरवपांडवांचा इतिहास नव्हता. त्यांच्याखेरीज शेकडो विलक्षण जिवंत अशा कथानकांनी महाभारताचा पट विणला गेलेला आहे. हास्य आणि शोक, रौद्र आणि बिभत्स, शृंगार जाण करूण, अदभुत आणि शांत अशा परस्परविरोधी सूत्रांनी व्यासांच्या अलौकिक प्रतिभेने गुंफिलेला महाभारतरूपी पट एवढा अनंत आणि विशाल आहे की, त्या मानाने बाईंचे लिखाण पुष्कळच सुटेसुटे आणि तुटक वाटू लागत. संपूर्ण महाभारतावरचा एक प्रबंध म्हणून 'युगान्त' कडे पाहता येणे कठीण आहे. १६१ । संस्कृती ।।