पान:Sanskruti1 cropped.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करून राहण्याच्या प्रवृत्तीला संप्रदाय आणि भाषा यांचे आधार असतात. असे कळप समाजात वेगवेगळ्या प्रमाणात बनतच जातात. सुधारणांच्या कार्यक्रमात सामाजिक गुलामगिरी नष्ट करता येते; व्यक्तीव्यक्तीचा निराळा पिंड विकसीत झाला, म्हणजे वंशपरंपरागत धंदेही संपतात. जीवनाच्या आधुनिकीकरणात विषमतेचे प्रमाण कमी होते; स्वातंत्र्य व न्याय वाढतो. आधुनिक सरकारे व आधुनिक शिक्षण विचारांचा आणि वर्तनांचा पुष्कळच मोठा सारखेपणा निर्माण करतात, तरी त्यामुळे कळप करून राहण्याची प्रवृत्ती संपत नाही; कळपांचे प्रकार बदलतात. इरावतींच्या समाजशास्त्रीय लिखाणाचे सामाजिक परिणाम दूरगामी आहेत. समाजशास्त्रातील एका पायाशुद्ध शास्त्रीय, भूमिकेचा आरंभ करणारे हे चिंतन आहे, आणि हे सारे. प्रायः इंग्रजी भाषेतील ग्रंथामधून आहे, म्हणून हा विस्तार करणे भाग पडले. समाजशास्त्रीय लिखाणाच्या मानाने इरावतीबाईंचे रामायण-महाभारतावरील लिखाण पुष्कळसे फुटकळ आणि तुटकतुटक असे आहे. त्यातल्या त्यात महाभारत हा ग्रंथ तर त्यांचा आयुष्यभराचा साथीदार होता. भारतीय नातव्यवस्था तपासण्यासाठी म्हणून १९५० च्या आसपास सगळीच उपलब्ध चिकित्सक आवृत्ती त्यांनी वाचलेली होती. त्याआधी आणि त्यानंतर अनेक वेळा त्यांनी महाभारताची पारायणे केलेली होती. महाभारताचा शास्त्रीय अभ्यास करत असताना महाभारतात त्यांनी पुष्कळदा आपले स्वतःचे जीवन वाचण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारतातील काही कथांना आपल्या कल्पनेप्रमाणे थोडी नवी जोड देण्याचा काही वेळा त्यांनी प्रयत्न केला. वातूनच 'गांधारी' सारखा त्यांचा ललितलेख निर्माण झालेला आहे. 'द्रौपदी व लेखाला त्यांनी शेवटी जी पूस्ती जोडली आहे, ती अशाच प्रकारची लत भर आहे. या 'द्रौपदी' च्या पुस्तीवरूनच त्यांचे आणि माझे एकदा कडाक्याचे भांडण झाले होते. 'युगान्त' च्या प्रस्तावनेत नाव न घेता या भांडणाचा उल्लेख बाईंनी केला आहे. द्रौपदीवर लिहिताना बाईंनी अशी कल्पना केली की, द्रौपदी भूमीवर पडल्यानंतरसुद्धा चटकन मेली नाही. आसन्नमरण अवस्थेत जीवनमत्यच्या सीमेवर द्रौपदी पडलेली असताना १५९ || संस्कृती ।।