पान:Sanskruti1 cropped.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| तुकडे झालेले नाहीत; तर वेगवेगळ्या गटांचा समुच्चय 'कुंभार' या नावाने एकत्रित झालेला आहे, हेच महार, ब्राह्मण, सोनार यांनाही लागू आहे. जाती फुटून पोटजाती बनलेल्या नाहीत, तर एकच धंदा करणारी आपापले स्वयंपूर्ण गट असणारी माणसे विचारात घेताना जाती बनलेल्या आहेत. म्हणून इरावती कर्वे ज्यांना आजवर पोटजाती मानित गेले, त्यांना जाती मानितात, व ज्यांना आजवर जाती मानले गेले, त्यांना जातिसमूह मानितात. आणि जातींची व्याख्या करिताना सोयरे आणि भावकी मिळून जात, कुटुंबाचा जी हा दुहेरी विस्तार असतो त्यात नात्याच्या परिघात येऊ शकतील असा गट म्हणजे जात, - अशी मांडणी त्या करतात. | सत्याचे खरे स्वरूप. असेच असते की, ते सांगितल्याबरोबर पटते. इतके ते उघड असते; फक्त आजवर लक्षात आलेले नसते. उरलेल्या तात्त्विक चर्चा अशा रितीने पकडलेल्या सत्यातील अनुस्यूत असणारे धागेदोरे उलगडून सांगण्यासाठी असतात. कुटुंबात माणसे नात्यांनी जोडिलेली असतात. हे असे सांगितल्याबरोबर चटकन जाणवणारे तत्त्व आहे. आई, बाप, बहीण, भाऊ ही जन्माच्या नात्याने जोडलेली असतात; आणि सुना, जावई, जावा, भावजयी लग्नाच्या नात्याने जोडलेली असतात. जन्माची नाती आणि सोयरपणाची नाती यांचे कुटुंब बनते. यातील दोन भाऊ, त्यांची मुले, त्यांची मुले असा विस्तार पाहिला, म्हणजे भावकी असते. प्रत्येकाच्या बायका आणि प्रत्येकाचे मेहणे यांचा विस्तार पाहिला, म्हणजे सोयरे असतात. जवळचे, दूरचे, सर्व भावकी आणि सर्व सोयरे मिळून एक जात तयार होते, | वाढलेले कुटुंब ही इरावतींनी जातींची व्याख्या केलेली आहे. | आपल्या परिघात विवाह करणा-या मंडळींची एक जात ही कल्पना '९त केली, म्हणजे पुढच्या अनेक कल्पना स्पष्ट होऊ लागतात. जे टोळ्याटोळ्यांनी आले. त्यांच्या टोळ्यांचे तुकडे जातींमध्ये विखुरले गेले आहेत; म्हणून भिन्नभिन्न जाती वंशाच्या दृष्टीने जवळच्या वाटतात आणि एकाच जातीचे मानिले जाणारे पण विवाह अशक्य असणारे गट वंशाने भिन्न वाटतात. देशस्थ ब्राह्मण हेही ऋग्वेदी, कोकणस्थ ब्राह्मण हेही ऋग्वेदी. पण १५५ ।। संस्कृती ।।