पान:Sanskruti1 cropped.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सापडतात. कुटुंबरचनांमध्ये सर्व भारतभर आढळणारे जातिनिष्ठ विशेष आणि प्रादेशिक विशेष एक मुद्दा स्थिर करतात. तो म्हणजे हिंदुस्थानात आपली संस्कृती दुस-यावर लादण्याइतका अवसर मिळालेलाच नाही. तसा निर्विवाद लष्करी जय कुणाचाच झालेला नव्हता. आर्यभटांनी संपूर्ण भारतावर गुलामगिरी लादली, या अर्ध-राजकीय, अर्ध-सामाजिक भूमिकेचा भारताची ही सामाजिक व्यवस्था निरास घडवून आणते. | खरे तर हेही विचारावयाला पाहिजे की, वर्णव्यवस्था आर्यांची तरी होती काय? वर्णव्यवस्थेचे जर आपण बारकाईने परीक्षण करु लागलो, तर ती शेतीप्रधान स्थिर संस्कृतीची व्यवस्था आहे, पशुपालनाच्या अवस्थेतील भटक्या टोळ्यांची व्यवस्था नाही. ही गोष्ट उघड होईल. शेतीप्रधान स्थिर संस्कृती निर्माण झाल्याशिवाय वैश्य आणि शूद्र हा तुकडाही पडू शकत नाही. आणि लढण्याचे काम एका वर्गाच्या हवालीहि करिता येत नाही. भटक्या टोळ्यांमध्ये सर्वांनाच लढाऊ असणे भाग असते. आर्यांचे हिंदुस्थानातील जगमन हे एका सुव्यवस्थित संस्कृतीचे, एका स्थिर संस्कृतीचे भारतात जगमन नव्हते. ते भटक्या टोळ्यांचे आगमन होते. या भटक्या टोळ्या मान हजार वर्षे तरी टोळ्याटोळ्यांनी भारतात येत होत्या. त्यांपैकी आर्य Soया अनार्यांशी लढत होत्या, आपापसांत लढत होत्या. आधी येऊन स्थिर झालेल्या टोळ्या नव्याने येणा-यांशी लढत होत्या. या नानाविध Coयांना एकच-एक देवताही असण्याचा संभव नाही, त्यांची एकच-एक प्यवस्था असण्याचा संभव नाही, आर्यलोक भारतात उत्तरेकडून आले. पकडून येताना जे प्रदेश वसवीत ते आले. त्या प्रदेशांत त्यांनी वर्णव्यवस्थेचे अवशेष मागे सोडलेले दिसत नाहीत. आर्य भारतात आल्यानंतर येथे "प्या संस्कृतीला किमान स्थिरता आणि किमान समृद्धी मिळाल्यानंतर १ वर्णव्यवस्थेचा विचार त्यांना करता येणे शक्य होते. अशा वातावरणात वर्णव्यवस्था ही वैदिक आर्याची व्यवस्था होती, हे पटणे कठीण आहे. खरी " अशी आहे की, भारतात येण्यापूर्वी वेदांची फारशी सूक्ते रचिली गेली असण्याचा संभव नाही. सिंधच्या परिसरात रचिल्या गेलेल्या वैदिक सूक्तांत १५१ || संस्कृती ।।