पान:Sanskruti1 cropped.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आजचे भारतीय जीवन पाहताना तीन भाषागट आपल्याला दिसतात. पहिला गट आर्यभाषांचा किंवा संस्कृतोभ्दव भाषांचा आहे. शास्त्रीय पद्धतीने सांगावयाचे, तर हे इंडो-युरोपियन भाषांचे कुल आहे. पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत हे कुल पसरलेले आहे. दुसरे भाषाकुल द्रविड भाषांचे आहे. कर्नाटकापासून दक्षिणेच्या टोकापर्यंत हे कुल पसरलेले आहे. पण यांखेरीज तिसरे एक भाषाकुल आहे. शास्त्रीय भाषेत हे भाषाकूल ऑस्ट्रो-आशियाटिक भाषांचे कुल मानिले जाते. स्थूलपणे याला आपण आदिवासी नाग व मुंडा भाषाकुल म्हणू शकू. आर्यांच्या आगमनापूर्वी जो भारत वसविलेला होता तो नेमका कुणी, हे वादग्रस्त असले, तरी पुरावा आहे तो द्रविडांच्यापेक्षा मुंडांच्याकडे जास्त झुकणारा आहे. इरावतीबाईंनी विशिष्ट पद्धतीने हा पुरावा नोंदविलेला आहे. या पुराव्यातील पहिली महत्त्वाची बाब अशी की, द्रविडांचे अतिशय प्राचीन वाड्मय उपलब्ध आहे. हे सगळे वाड़मय नवा प्रदेश व्यापण्याच्या उत्साहाने भरलेले व भारलेले आहे. भारतातील द्रविडांनी दक्षिणेच्या बाजूने भारताच्या बाहेर वसाहती केल्याचे पुरावे आहेत. आपला प्रदेश सोडून बाजूला ढकलल्या गलेल्या समाजाच्या मनोवृत्तीशी जुळणा-या पराभूतांच्या कथा व हकीकतींची परपरा द्रविडांच्यामधे नाही आणि द्रविडांच्यामध्ये उत्तरेतील चालीरितीही नाहीत. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने उत्तरेच्या वंशाचे प्रबल अवशेषही द्रविड भाषाकुलांनी व्यापलेल्या प्रदेशात दिसत नाहीत. याचा अर्थ हा की, दक्षिण भारतात आज ब्राह्मण म्हणून ज्या जाती नांदत आहेत, त्याही उत्तरेतून लल्या वंशांनी बनलेल्या नाहीत. आणखी एक मुद्दा इावतींनी अधुनमधून 'पत केलेला आहे. पण त्या मद्याचा परेसा तपशील देण्याइतके त्याचे त्व त्यांना जाणवलेले दिसत नाही. मला स्वतःला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा वाटतो. मोहेंजोदारो आणि हरप्पा येथील उत्खननात लोखंड आढळत नाही. या संस्कृतींना फार मोठ्या प्रमाणात लोखंड उपलब्ध असलेले दिसत नाही. ही लोखंडाची उणीव केवळ सिंधुसंस्कृतीपुरती मर्यादित नाही, तर त्यानंतर कैक सहस्त्रकांनी सम्राट अशोकाचा जो काळ येतो, त्या १४९ ।। संस्कृती ।।