पान:Sanskruti1 cropped.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जातींच्यापेक्षा निराळी, सर्व भारतभर पसरलेली, पूर्वी वर्ण असलेली पण आता जात झालेली क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या तीन नावांनी संबोधिली जाणारी अशी निराळी लोकसंख्या दाखविल्याशिवाय वर्णांतून जाती निर्माण झाल्या, ही कल्पना सुसंगतपणे मांडता येणे अशक्य आहे. मुळात वर्णव्यवस्था कधी पोथ्यांच्या बाहेर, कल्पनांच्या बाहेर प्रत्यक्ष समाजजीवनात अस्तित्वात होती, हे दाखविता येणेच कठीण आहे. पुराणांची जर बारकाईने पाहणी केली, तर क्षत्रियांना स्वतःची गायींची खिल्लारे होती. ब्राह्मणांजवळ स्वतंत्र गायींची खिल्लारे होती, याचे हवे तेवढे नमुने पाहण्यास सापडतील. आणि शेती करणारे, शिकार करणारे ब्राह्मण यांच्या शेजारी अध्यात्माचे शिक्षण देणारे क्षत्रियही दिसतील. याच पुराणांमध्ये शेती आणि पशुपालन हे वैश्यांचे काम आहे, असेही सांगितलेले दिसेल. आणि नंदगवळी वैश्य होता, क्षत्रिय होता, की शूद्र होता, याचा पत्ता नसल्याचेही आढळून येईल. शेवटी कृष्णाचे बाळपण शूद्रांच्या सहवासात गेले, असे आपण म्हणणार आहोत की दिगवळी क्षत्रिय होता, असे म्हणणार आहोत? सर्व उद्योगधंदे करणारे शूद्रच होते असे म्हटले, तर गवळी शूद्र होतील आणि विराटाच्या गायी पळविण्यासाठी आलेले कौरव पशुपालनात रस घेणारे शूद्र होतील. अस्तित्त्वात त्या त्या प्राचीन काळीही जातिसदृश्य टोळ्या. या टोळ्या सोयीस्करपणे अथव्यवस्थेच्या नामावळीत पौराणिकांनी बसविल्या; त्याला शिस्तच कधी जाला नाही. रावण हा राक्षस होता आणि ब्राह्मण होता; शिवाय तो राजा Cl, म्हणून क्षत्रिय होता. वैदिक तर होताच व एका शूद्रीचा मुलगा होता. हा राक्षस क्षत्रिय होते; त्यांची राज्ये होती. हिडिंब, बकासुर हे असे काही पास होते की, जे ब्राह्मण होते की शूद्र होते, याचा पत्ताच नाही. हेच दास, योगांविषयी आहे, किरात, नाग, पक्षी, वानर, ऋक्ष या टोळ्यांविषयी आहे. | वर्णव्यवस्था कल्पनेत होती. ती प्रत्यक्षात कधीच नव्हती. प्रत्यक्षात जी थाचे अस्तित्वात नव्हती. ती जातींना जन्म देण्याची शक्यताच नव्हती. खरे म्हणजे ज्या जाती आहेत असे आपण म्हणतो, त्या जाति नसून ते १४७ ।। संस्कृती ।।