पान:Sanskruti1 cropped.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सेवकभावनेने वागतही नव्हते. या वन्यांना स्वतःच्या धर्मविधीसाठी ब्राह्मणांची गरज नव्हती. त्यांचा स्वतःचा पुरोहित होता. त्यांना स्वतःच्या संरक्षणसाठी सभ्य समाजातील क्षत्रियांची गरज नव्हती. ते स्वतःच स्वसंरक्षक लढवय्ये होते. हे वन्यांचे इतस्ततः विखुरलेले असे टोळ्याटोळ्यांनी वावरणारे लक्षावधींचे समूह ही सगळ्याच समाजशास्त्रज्ञांच्या पुढची अडचण होती. म्हणून हे। समाजशास्त्रज्ञ नेहमी "Castes and Tribes" असा जाड-शब्दप्रयोग करीत. वर्णातून जाती निर्माण झाल्या, या विधानाला वन्य समाजाचा फार मोठा अडथळा होता; कारण हे वन्य समाज हिंदू तर वाटत होते आणि जातिव्यवस्थेत तर सामावले जात नव्हते. या शास्त्रज्ञांच्या समोर दुसरा महत्त्वाचा मुद्दा धार्मिक चळवळींचा होता. ब्राह्मणी धर्मात वर्णव्यवस्था होती. (हिंदुधर्माचे हे नामकरणच ब्राह्मणांनी समाजव्यवस्था निर्माण केली, असे सांगणारे आहे.) पण बौद्ध, जैन धर्मात वणव्यवस्था नव्हती. तिला धर्मसमर्थन नव्हते, तिला टिकविणा-या ब्राह्मणांचे या चळवळीत प्राधान्य नव्हते. लिंगायतांसारख्या अलीकडच्या संप्रदायाचे तर ऐतिहासिक ज्ञान पुष्कळच तपशिलाने उपलब्ध आहे. ही माणसे वेदप्रामाण्य जाण ब्राह्मण यांच्या विरुद्ध लढणारी दिसत होती. पण त्यांच्यातही जातिव्यवस्था सापडतच होती. ती बौद्ध-जैनांतच होती असे नसून लिंगायत महानुभावांत होती हिंदुस्थानातील मुसलमान, खिस्ती आणि ज्यू यांच्यातही जापापसात विवाहसंबंध नव्हते, आणि या जातिभेद मोडण्याच्या प्रत्येक पळीत ब्राह्मण थोडाफार दिसतच होता; कारण अनेक बौद्ध जैन पंडित, १ महानुभाव पंडित हे ब्राह्मण होते. जातिभेदाच्या विरुद्ध आवाज विणा-या मध्ययुगातील संतमंडळींतही ब्राह्मणांचे प्रमाण थोडे नव्हते. व ब्राह्मण आहे, तेथेही जाती आहेत; जेथे ब्राह्मण आणि वर्णव्यवरथा नाही तेथेही जाती आहेत. जेथे ब्राह्मण आणि वर्णव्यवस्था यांच्याविरुद्ध Gई आहे, तेथेही जाती आहेत. ही घटना वर्गातून जाती निर्माण होण्याच्या छ जाणारी आहे. तरीही वर्णातून जाती निर्माण झाल्या आणि ब्राह्मणांनी प्यवस्था निर्माण केली, हे मुद्दे या विचारवंतांच्या तात्त्विक विवेचनात हातच. किंबहुना, ज्या डॉ. केतकरांनी जाती वर्णातून निर्माण झाल्या होत, असे प्रतिपादन केले. त्यांनीही हिंदुसमाजाच्या संघटनेचे नेते नेहमीच ब्राह्मण होते, असे मत दिले. १४५ ।। संस्कृती ||