पान:Sanskruti1 cropped.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुणकर्म पाहून परमेश्वर या जन्मी कोणत्या वर्णात जन्माला घालावयाचे ते ठरवितो, असा गीतेतील श्लोकाचा आशय आहे. व्यक्तीला त्याच्या लायकीप्रमाणे वर्ण मिळतो, हे गीतेला अभिप्रेत नसून ज्या वर्णात व्यक्तीचा जन्म झाला त्या जन्मावरून व्यक्तीने गतजन्माची आपली लायकी ओळखावी, असे गीतेला अभिप्रेत आहे. वर्णव्यवस्था भारताच्या इतिहासात कधीकाळी गुणकर्मावरून ठरत होती, याला कोणताही आधार नाही. गुणकर्मावरून वर्ण ठरविण्यासाठी व्यक्ती कोणत्याही वर्णाची नसताना जन्मावी लागते; आणि मग कुठेतरी २५-३० वर्षे वर्णाबाहेर जीवन गेल्यानंतर प्रौढ वयात गुणकर्म पाहून वर्णाचे निर्णय द्यावे लागतात. हिंदूंच्या इतिहासात वर्णविहीन अवस्थेत जन्म, बालपण, प्रौढपण, आणि नंतर गुणकर्मावरून व्यक्तींचा वर्ण ठरविणाया संघटना आणि रचना असल्याचा पुरावा नाही. ही रचना असू शकत नव्हती. गणकर्मावरून वर्ण ठरावयाचे असतील, तर निदान पहिली २५-३० वर्ष संस्कारहीन अवस्थेत जाऊ देणे भाग असते. हा धोका कोणीच पत्करला नव्हता. वर्णव्यवस्थेची कल्पना नेहमी जन्मावरूनच गृहीत केली जात होती. म्हणूनच आठव्या वर्षी उपनयन कुणाचे करावयाचे, कुणाचे करावयाचे नाही, हे ठरविता येत होते. आणि समाजात चातुर्वर्ण्य स्वाभाविक असते, असेही म्हणण्यात अर्थ 6. कारण प्रत्येक धंद्याचे शिक्षण द्यावे लागते. प्रत्येक उद्योगाचे शिक्षण " उद्योगातील वाकबगार व माहितगार लोकच देऊ शकतात. शिक्षण देणे * जर ब्राह्मणांचे काम असेल, तर ब्राह्मणच सर्व धंद्यांमध्ये वाकबगार होते, पनि जोडे कसे करावे, चामडे कसे कमवावे, हेही माहित होते; आणि याव्यवसाय कुशलपणे कसा चालवावा, याचीही त्यांना जाणीव होती, अ म्हणावे लागेल. सगळेच धंदे ब्राह्मण करीत होते, असे मानावयाचे, ज ब्राह्मण शुद्रही होते असे मानले पाहिजे, आणि धार्मिक उद्योग पास कोणताच व्यवसाय ब्राह्मण करीत नव्हते असे म्हणावयाचे असेल, असणाखेरीज इतर अनेकांना शिक्षण देण्याचे काम करावे लागत होते, ९५ लागेल. ते लढण्याचे काम करितात, त्यांना राज्य करण्याचा १४१ || संस्कृती ।। असे म्हणावे लागेल. ते लढण्र