पान:Sanskruti1 cropped.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होऊन जाते. विशेषत; या अशास्त्रीय विवेचनातच पुष्कळदा अत्यंत मार्मिक | आणि विचारप्रवर्तक सूचना असतात, वेदातील अगस्त्य-लोपामुद्रासंवाद प्रसिद्ध आहे. विशेषतः अगस्त्य हा दक्षिणेकडे वसाहत करणारा पहिला वैदिक ऋषी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे 'लोपामुद्रा' ही ‘लोपामुंडा' होती काय, असा बाईंना प्रश्न पडला आहे. अर्जुनाची एक बायको उलूपी हिचे नाव लोपाशी मिळतेजुळते आहे. उलूपी ही नागकन्या असल्यामुळे तिचा मुडा-वंशाशी संबंध स्पष्ट आहे; आणि मुंडा वंशातील टोळ्यांची आर्यपूर्व वस्तीही पुराव्यांनी सिद्ध होणारी आहे. 'लोपामुद्रा' ही जर लोपामुंडा असेल, तर फार मोठे नवे प्रश्न उपस्थित होणार आहेत. मुद्दा एका संशोधनाच्या नव्या दिशेला गती देणारा आहे. अडचण असेल, तर इतकीच की, हा संवाद ऋग्वेदातील आहे. ऋग्वेदातील आर्य नुकतेच कुठे गंगेच्या जवळ येऊ लागले होते. प्रामुख्याने सिंधूच्या खो-यातच त्यांचे जीवन चाललेले होते. भारताच्या या विभागात मुंडा वंश कधी होता काय, याचे पुरावे सापडत नाहीत. रामायणाच्या विवेचनात असाच एक मार्मिक प्रश्न बाईंनी उपस्थित कला आहे. “कैकेयी म्हणते, रामाला राज्य मिळाले, तर काय बिघडले? त्याच्यानंतर भरत राजा होईलच. वडील भावाचा वारस धाकटा भाऊ होण्याची परंपरा नेपाळच्या राजवंशातील आहे. त्या परंपरेचा अवशेष कैकेयीच्या या विधानात उतरलेला दिसतो." पुन्हा बाईंची सूचना मार्मिक आहे, इतकेच *हणून थांबले पाहिजे. कारण वारसाहक्क धाकट्या भावाला जावा, ही परपरा जर रामायणाच्या कथाकारांना महत्त्वाची वाटली असती, तर रामाला अभिषेक होण्यापूर्वी दशरथाला भाऊ नाही, याची खात्री सर्वांना करून दिली असती. बाईच्या अशास्त्र लिखाणातसुद्धा खूप मोठी विचारप्रवर्तकता असल्यामुळे त्यांच्या विवेचनाचा सगळाच भाग अभ्यासनीय होतो, आणि त्या लिखाणात एक मोठा थर अशास्त्रीय विवेचनाचा असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी बाईंच्या विवेचनावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची तर्कशुद्धता दर वेळी तपासून घ्यावी लागते. एक अगदीच साधे उदाहरण घ्यावयाचे, तर 'चाचा', 'काका' १३७ । संस्कृती ।।