पान:Sanskruti1 cropped.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्यांना आपण मूलभूत मानवी भावना म्हणतो, त्या भावना या स्वरूपात मूलभूत व सार्वत्रिक असल्या, तरी त्यांचे आविष्कार वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धतींनी होतात. ही सुखदुःखांची भिन्नता वेगवेगळ्या रचनांत किती वेगवेगळी असू शकते, या मुद्यांचा तपशील वाङ्मयाच्या आधारे गोळा करावयाला पाहिजे. बाईंनी जाता-जाता हा एक मुद्दा सुचवून टाकलेला आहे. समाजशास्त्राच्या अध्ययनाचे एक नवे दालन या मुद्याच्या अनुसंधानातून निर्माण होईल, असे मला वाटते. पितृपरंपरेच्या समाजात जावा-जावांची भांडणे, नणंदा-भावजयांची भांडणे, सासू-सुनांची भांडणे ही अतिशय प्राचीन आहेत. पाणिनीसारखा व्याकरणकार परस्परांचे स्वभावशत्रू एकत्र उल्लेखिता येतात, हे सांगताना साप आणि मुंगूस यांचा 'अहिनकुल' असा उल्लेख करितो, तसाच तो 'नणंदा-भावजयां' चा करितो. मातृपरंपरेत जावा-जावा एका घरात नांदण्याचा संभव नसतो. त्याचप्रमाणे नणंदा-भावजयाही एका घरात येतच नाहीत. माहेरी जाणा-या मुलीची हुरहूर ही या परंपरेला अज्ञातच आहे. त्याप्रमाणे सासरी जाणा-या मुलीच्या विरहाने तळमळणारी आई हीही या परंपरेला अज्ञात असणार. पुत्रजन्माचा सोहळा हा पुरुषांसाठी एक धन्यतेचा सोहळा असतो. आजा मेला की नातवाला त्याचे नाव • डेवितात. पुत्राच्या रूपाने आपणच पुन्हा जन्माला येतो, अशी समजूत आहे. पुत्र म्हणजे वार्धक्यात आपला आधार हा दिलासा आहे. मातृपरंपरेत हे। सारेच बदलणार. मातृपरंपरेलाही स्वतःची सुखदुःखे असतील, त्याचा आविष्कार त्याच्या वाड्मयात आढळेल; त्याची कल्पना मात्र आपणांला करिता येणे कठीण आहे. सुखदुःखाच्या या आकृतिबंधावर समाजरचनेचा आकृतिबंध परिणाम करीत असतो. त्याचे स्वरूप पुन्हा-पुन्हा तपासून सांगणे हे एक नाट दालन आहे. वेळावेळी इरावतीबाईंनी समाजरचना आणि भावनाविष्कार यांचे संबंध स्पष्ट केले आहेत. | एक उदाहरण घ्यावयाचे, तर महाराष्ट्रातील विशिष्ट चालीचे घ्यावे लागेल. येथे मामाची मुलगी बायको करण्याची पद्धत आहे. सासू झालेल्या या नव्या संबंधातील स्त्रीला आता नवे अनुभव येतात. लेकीला मूळ म्हणून १३३ ।। संस्कृती ।।