पान:Sanskruti1 cropped.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इरावतीबाईंच्या पूर्वी जसा वंशशास्त्रीय मोजमापांचा फार व्यापक प्रमाणावर विचार झालेला नव्हता, तसा कुटुंबव्यवस्थेचाही फारसा व्यापक विचार झालेला नव्हता. त्यांच्या पूर्वी युरोपीय संशोधकांनी जातींचे व टोळ्यांचे वर्णन केलेले होते. पण पाश्चात्य जीवनात रुजलेल्या या संशोधकांना भारतीय समाजव्यवस्थेत कुटुंबव्यवस्थेचे मूलभूत स्थान जाणवण्याची शक्यता नव्हती. युरोपात ख्रिश्चन धर्माने आपल्या प्रचारप्रसाराबरोबर आधीच्या सगळ्या व्यवस्थाच संपुष्टात आणल्यामुळे युरोपात ज्यावेळी अभ्यासाच्या नव्या परंपरा सुरु झाल्या, त्या वेळी सर्व युरोपची कुटुंबव्यवस्था जवळजवळ एकसारखी होती. ज्या समाजात सर्वांचीच कुटुंबव्यवस्था समान असते, त्या समाजातील अभ्यासकांना कुटुंबव्यवस्था हाच एक अभ्यासाचा विषय आहे, असे जाणवण्याचे कारण नव्हते. आपल्या समाजात जाती नाहीत असे त्यांना वाटे, म्हणून भारतातील जातिव्यवस्थेचे वर्णन त्यांना महत्त्वाचे वाटले. त्यांच्या समाजात नानां धर्म, संप्रदाय, नाना देवता, उपासनेच्या नाना पद्धती नव्हत्या, त्यांचा अभ्यास त्यांना अगत्याने करावासा वाटला भारतासारख्या देशात भिन्न भिन्न प्रकारची कुटुंबव्यवस्थाही असेल, अ आरंभीच्या संशोधकांना फार उत्कटतेने जाणवले नाही. नंतर हळूहळू या भिन्नतेची जाणीव होऊ लागली. इरावतीबाईच्या काही टोळ्यांच्या कुटुंबरचनेचे अभ्यास झाले होते. पण एकतर हे अभ्या एकेका टोळीपुरतेच मर्यादित होते; आणि दुसरे म्हणजे या अभ्यासाचे स्व प्रामुख्याने स्पष्टीकरणात्मक, विवरणात्मक असे आहे. संपूर्ण भारत कुटुबरचनेचा व्यापक पायावर आणि तपशिलाने अभ्यास करण से अभ्यासातून व्यापक निष्कर्ष काढणे हे काम इरावतीबाईंनीच प्रथमच हा कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास करताना त्यांनी वर्तमानकालीन समाज विवरणाला, ऐतिहासिक अभ्यासाची जोड दिली. सर्व प्रदेशांतील सर्व प्र घटकांचा विचार करुन कुटुंबरचनेला धार्मिक, वांशिक अथवा बंधने यापेक्षा प्रादेशिक बंधने कशी महत्त्वाची ठरली आहेत, याचे दर्शन घडविले. या कुटुंबरचनेपैकी दक्षिणेकडील व्यवस्थेचा तर " शक अथवा टोळ्यांची आहेत, याचे त्यांनी वस्थेचा तर पहिला । संस्कृती ।। १२६