पान:Sanskruti1 cropped.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पण मी नाव बदलले नाही आणि पुढे गंमत अशी आहे की-" असा आरंभ करुन त्या म्हणाल्या असत्या की, "हिंदुस्थानात हिंदू, बौद्ध, जैन इत्यादींची कुटुंबव्यवस्थाही हिंदूंची आहे. आणि जी कुटुंबव्यवस्था हिंदूंची नाही, ती व्यवस्था भारतातील नव्हे, भारताबाहेरुन आयात झालेली आहे हे हटनला नाही, तरी तुम्हांला कळायला हवे होते. नाहीतरी चुलत-भावाबहिणींची लग्ने मान्य करणारी मुस्लिम कुटुंबव्यवस्था भारतात साकार होणे शक्यच नव्हते.” बाई असत्या, तर त्यांच्या विवेचनावर आक्षेप घेताना त्या काय म्हणाल्या असत्या, याविषयीचे स्वप्नरंजन करणे हा एक दिलाशाचा भाग जाह. फार विरोधी बोललो असतो, तर त्या एवढेच म्हणाल्या असत्या की, सरळ सांग, बाबा खेकड्यासारखा तिरपातिरपां वागू नकोस!" | बाईचे जीवन ही एक न संपणारी आणि अनाग्रही अशी ज्ञानसाधना . १९०५ साली त्या जन्माला आल्या आणि १९३० साली तर बर्लिन चापीठाची डॉक्टरेटही त्यांनी मिळविली. त्यांच्या पिढीत इतक्या लहान पयात समाजशास्त्रासारख्या नवख्या विषयात विदेशयात्रा करून डॉक्टरेट ही नवलाचाच प्रकार म्हटला पाहिजे. त्यांच्या लिखाणात ठिकठिकाणी पिणारा 'दिनू' त्यापूर्वी शिकण्यासाठी विदेशी गेला होता; आणि नंतर या शिकण्यासाठी विदेशी गेल्या. जिद्दीने संसार मांडलेल्या आणि संसारात पाची वृत्ती असणा-या या विलक्षण सुगृहिणीची ज्ञानयात्रा आणि संसारयात्रा पराच्या संगतीने कशी चालली असेल, हे समजणे कठीण आहे. ज्ञानयात्रेत "गी झालेल्यांनी सांसारिक जबाबदा-या नेहमी बाजूला ठेविलेल्याच ": बाइच्या घरात मात्र उत्खननातून नुकत्याच काढलेल्या कवट्या, ताची अगर वेदांची खुणा केलेली बाडे व मुलामुलींच्या बाहुल्या TOपणे एकाच अंथरुणावर वावरत असत, आणि ह्या गृहकृत्यदक्ष कुशल गहि शल गृहिणीला मानववंशशास्त्राच्या अध्ययनाची कधी अडचण वाटत "नाला वाहिलेल्या एका ऋषीचे आणि संसाराला वाहिलेल्या गृहिणीचे व्यक्तिमत्त्व त्यांच्यात एकजीव झालेले होते. डोकावा १२३ । संस्कृती ।।