पान:Sanskruti1 cropped.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| पण संपत्तीच्या विषम वाटणीपेक्षा बोचक गोष्ट म्हणजे अधिकाराची व मानाची वाटणी. अगदी लहान अधिकारापासून ते मोठ्या अधिकारापर्यंतच्या सर्व जागी अधिकार एकसारखाच फिरत राहिला, तर समाजाचे स्थैर्य बिघडते. तो कायम किंवा ब-याच काळापर्यंत एकाच व्यक्तीच्या किंवा गटाच्या हातात राहिला, तर समाज कुजल्यासारखा होतो व असंतोषाची बाज धुमसत राहून त्याचा भडका होण्याचा संभव असतो. कुटुंबात बाप किवा आई आपल्या अधिकाराचा त्याग करण्यास तयार होत नाही. संस्थांतूनही सर्वत्र हीच स्थिती आढळते. कोणी पैसे दिले, म्हणून अधिकार गाजवू पाहतात. कोणी गट करून वर्षानुवर्षे एका लहानशा वर्तुळातच सर्व अधिकार द्रित करतात. कोणाला अधिकाराची जागा मिळाली की, ती काही वर्षे अनुभवून दुस-या कोणास संधी द्यावी, असा कधी विचारच कोणी मनात जात नाही. दुसरे काही नाही, तर एखादी सही किंवा एखादे मत पढातरी हक्क रहावा, म्हणून सतत धडपड चालते. अधिकार संक्रमण अतिपणे व्हावे म्हणून नियमित कालांतराने निवडणुका, विशिष्ट वयानंतर निवृत्ती वगैरे अनेक युक्त्या निरनिराळ्या समाजांत योजिलेल्या दिसतात. समता निर्माण करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत, त्या सर्वच "या आहेत. पण सामायिक संपत्तीची निर्मिती जोपासना व संवर्धन ह्या " त्यात कठीण आहेत. सपाट, खाचखळगे नसलेले रस्ते सर्वांना असतात; पण त्यावर विटीदांडू खेळावयाला, गली करावयाला किंवा प्या मांडवांच्या खांबांसाठी खड़े करावयाला किंवा होळी पेटवावयाला " काही वाटत नाही. नगरपालिका रस्त्यावर झाडे लावते, त्यांना " चालत; पण लोकांच्या उघड लुटीपुढे ती टिकणे शक्य वाटत नाही. ती झाडे फुलांची असली, तर फुलांसाठी संबंध नाची असली, तर फुलांसाठी सबंध झाड ओरबाडून काढणे, पाला काढणे, दस-याला सोने लुटण्यासाठी कोवळ्या झाडांच्या 1 मोडून हिसकून काढणे, एखादे झाड औषधी म्हणून त्याची । काढणे व कोणी पाहत नाही असे साधुन झाडच तोडून नेणे हे प्रकार व मुता-या सरोस चालतात. धर्मशाळांतून घाण करणे, सार्वजनिक ११७ फांद्या हातांनी । संस्कृती ।।