पान:Sanskruti1 cropped.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| पण ते करण्याआधी आणखी एकदोन तत्त्वांचा विचार केला पाहिजे. ती म्हणजे 'सत्य' व 'न्याय'. समता, बंधुता, स्वातंत्र्य ही तत्त्वे ज्याप्रमाणे समाजरचनेची तत्त्वे होऊ शकतात, त्याप्रमाणे सत्य होऊ शकेल का? सत्य म्हणजे जे आहे ते. खरोखर पाहता त्याला चांगला किंवा वाईट असा काहीच गुण नाही. इतर तत्त्वांत 'आहे-ते' बरोबरच, किंबहुना आहे-ते' पेक्षा थोडा जास्त जोर 'असावे-ते' ह्यावर आहे. अप्रमाण आचारविचारांबद्दल पचार करताना मी प्रतिपादन केले होते की, आचारविचारांची प्रमाणे उरावण्यास सर्वच आचार कारणीभूत ठरतात. पण एक लक्षात ठेवले पाहिजे. या वेळी आपण ध्येयाकडे जावयाचा मार्ग कसा वेडावाकडा असतो, ते खविले. खुद्द ध्येयाची रूपरेषा सुस्पष्ट असते, की गोळाबेरीज कामचलाऊ असत? ध्येय हे 'अस्ति'-आहे, अशा स्वरूपाचे नसून 'सन्तु' -असोत, होवोत | अशा प्रकारचे असते. सूक्ष्म विचार केला, तर काही सांप्रदायिक सोडता याचे स्वरूप फारसे सुस्पष्ट असत नाही. ध्येयवाचक शब्द एकच असतो: निरनिराळे लोक व संघ तोच शब्द अर्थांच्या थोड्या थोड्या फरकाने उपयोगात आणतात. ध्येय ठरविण्यास सत्याचा उपयोग होतो म्हणावे, तर "° पटत नाही; कारण एका काळची स्वप्ने किंवा निव्वळ कल्पनाविलास उपन्या काळचे सत्य होऊन जाते. अंतरिक्षात भ्रमण करणे, दुस-या | जाणे, उत्तरध्रुवाच्या बर्फाखालून सर्व सुखसोयींनी युक्त अशा पाणबुडातून " ह्या गोष्टी पन्नास वर्षांपूर्वी कोणास शक्य तरी वाटल्या असत्या का? काही नवे शोध तर क्रांतीच्या दष्टीने ह्याहीपेक्षा महत्त्वाचे आहेत. नराचे वीर्य त ब-याच काळपर्यंत जिवंत अवस्थेत ठेवून ते मादीच्या गर्भाशयात " हा शोध नुसता आश्चर्यकारक नव्हे, तर विलक्षण क्रांतिकारक " आहे. शेतीत व पशुपालनात या शोधाचा सर्रास उपयोग होतोच. | पाच स्त्रिया नव-याकडन संतती होणे शक्य नसल्यास ह्या मागनि करून घेतात. पण नुकतेच एक असे उदाहरण घडले आहे की, S) प्रौढ कुमारिकेने या मार्गे प्रजोत्पादन करून घेतले. ही बाई एका या प्रमुख होती. एक उत्तम शिक्षिका, संचालिका व कर्तव्यदक्ष नागरिक १०७ ।। संस्कृती ।।