पान:Sanskruti1 cropped.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांप्रदायिक व्यवहारात शब्द व कृती ह्यांना विशेष महत्त्व चढते; त्या मागचा अर्थ म्हणजेच विचार नाहीसा होऊ लागतो. मंत्रातील एक शब्द जरी चुकला, तरी सर्व क्रिया फुकट जातेव क्रिया करिताना एक जरी गोष्ट सांगितल्यापेक्षा निराळी , तरी क्रियेचे झाला मोल जाते. असा हा आचारधर्म कालमानाप्रमाणे बदलणे कठीण होते; व कधीकाळी अर्थ असलेल्या सर्व क्रिया अर्थहीन किंवा त्यापेक्षाही भयंकर म्हणजे अनर्थकारक होऊन बसतात सांप्रदायिकांचे कर्मकांड म्हणजे एका काळी आत्मा असलेली जिवंत संस्कृती: पण आता ती मरून केवळ खटपटींचा व क्रियांचा सांगाडा तेवढा उरलेल्या भुतांचा वर्तमानकाळात चाललेला हैदोस होय. संप्रदायांच्या जागतिक इतिहासाकडे नजर टाकिली, तर असे दिसून येईल की, कर्मकांड व तत्त्वचिंतन ह्यांचा झगडा अखंड चालू असतो. काही वेळा तत्त्वचिंतनाला महत्त्व दिले जाते, पण सांप्रदायिकत्व हे बव्हंशी चिंतनाला मारक व कृतीला पोषक असते . (क) देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.