पान:Sanskruti1 cropped.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आढावा घेताना आपल्या अल्पमतीप्रमाणे त्यांच्या चितंनाचे महत्त्व ही मी सांगितलेले आहे. जे मला पटल नाही. ते पटत नाही, म्हणून स्पष्टपणे नोंदविलेले आहे. पण हे करताना माझी भूमिका बाईंचे मंडन करण्याचीही नाही, आणि बाईंचे खंडन करण्याचीही नाही. भालचंद्रमहाराज कहाळेकर यांनी फार वर्षांपूर्वी सुसंगती आणि विसंगती यांचे वर्णन करताना असे म्हटले होते की, संसार विसरून ज्ञानसाधना करणे ही एक संगती. आणि ज्ञानसाधनेतील तार्किकता विसरून रसिकतेने व निष्ठेने संसार करणे हीही एक संगती आहे या दोन संगती जरी परस्परांपेक्षा निराळ्या असल्या, तरी एकाच व्यक्तीमत्वात त्या चपखलपणे नुसत्या सामावत नाहीत, तर कधीकधी एकजीवही होऊन जातात. यांचा संगम पहावयाचा असेल, तर तो इरावती कर्वे यांत दिसतो. त्यांच्या ठिकाणी गृहिणी, गार्गी आणि कवयित्री तिघीजणी एकरूप होऊन अवतरल्या आहेत. ज्या वेळी हे ऐकिले, त्या वेळी बाईच्या इतके जवळ आपण कधी जाऊ. याची कल्पना नव्हती. ज्या वेळी बाईंच्या जवळ आलो. त्यांच्या वात्सल्यात चिंब झालो, त्या वेळी हे असे लिहावे लागेल, याचीही कल्पना नव्हती. बाईचे लौकिक श्राद्ध त्यांच्या पुत्रांनी केले असेल; हे लिखाण म्हणजे त्यांनी पुत्रवत मानिलेल्या एकाची फक्त वैचारिक , श्रद्धांजली आहे । नरहर कुरूदकर संस्कृती । १८१