७१८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय असलेल्या मंडळीने त्यास साह्य करण्याचे आश्वासन दिले. नंतर त्याने विवक्षित मंडळ स्थापन करून त्या मंडळास एक नाव द्यावे असे सर्वानुमताने ठरविले. या मंडळीस कोणते नाव द्यावे असेबद्दल मंडळीत बरीच वाटाघाट झाली. शेवटी सत् = खरे, शोधक = तपास करणारा, मंडळ = समाज, म्हणजे सत्याचा तपास करणारा समाज असे नाव देण्याचे ठरून तारीख २४ माहे सप्तंबर सन १८७३ रोजी सत्यशोधक समाज स्थापन झाला. त्याची प्रतिज्ञा म्हणजे तळी उचलून त्यातील भंडार व गुलाल कपाळास लावण्याचा संस्कार - जो कोणी समाजीयन होई त्याचे नाव रजिस्टर ( नोंदणी) बुकात दाखल करीत असत. समाज स्थापन झाला त्या दिवशी माडीवर फार गर्दी झाली होती व पुष्कळ लोक समाजीयन झाले होते. त्यानंतर मंडळीने समाजाचा झेंडा मिरविला व कार्तीकमाशी जोतीरावाने व समाजीयन लोकांनी ब्राह्मणाशिवाय तुळशीची लग्ने लावली. F
पान:Samagra Phule.pdf/७५९
Appearance