४४२ सोंवळा रे बनूनी, चढू नको मदाला इडापिडा मर्दूनी, सेव सत्य राजाला स्वतः श्रम करूनी, पोस स्वकुटुंबाला सदा सत्य वदूनी, सोड धूर्त मत्ताला विद्या शूद्रा देवूनी, लाजवी भूदेवाला शूद्र जन सेवूनी, आर्पी ईश्वराला महात्मा फुले : समग्र वाङ्मय भंड मत खोडूनी, जोती नमे ईशाला ॥ धृ० ॥ ह्या पुस्तकांत जो विवाहविधि दाखविला आहे त्यापैकीं मंगळाष्टकें व पूजा करण्याचे मंत्र हे महाराष्ट्र देशांतील कोणत्याही जातींतील लोकांस मोठ्याच उपयोगाचे आहेत. करितां ते सर्व कायम ठेवून देशाचारा व कुळाचाराप्रमाणें विवाहांत कित्येक प्रकार करावे लागतात ते बिनहरकत करावेत. हल्ली धर्मविधि करतांना नामधारी ब्राह्मण जे मंत्र किंवा मंगळाष्टकें म्हणतात, त्याचा संबंध प्रस्तुतचे विवाहास किंवा वेळासही नसून, त्या मंगळाष्टकांचा व मंत्रांचा काय अर्थ हेंही आमचे लोकांस समजत नसल्यामुळे केवळ आंधळ्यांचे व बहिऱ्यांचे बाजाराप्रमाणें होत आहे, म्हणून सत्यशोधक समाजाकडून विवाह व इतर कार्यासंबंधाचे धर्मविधि चालविण्यास कोणासही अडचण पडूं नये, म्हणून ते प्राकृत आणि सोपे असे तयार केले आहेत, यास्तव याचा लाभ सर्वांनीं घ्यावा अशी आमची विनंतीपूर्वक सूचना आहे. समाप्त --
पान:Samagra Phule.pdf/४८३
Appearance