इशारा ( ग्रामजोशांच्या हक्काबद्दलचा मोकदमा नंबर ८३१ सन १८८४ यांतील हंशील . ) जाहीर खबर ४१९ सर्व हिंदु धर्मानुयायी त्यांतून मुख्यत्वेंकरून मराठे, माळी, कुणबी, कोळी, धनगर वगैरे जातीचे लोकांस ह्या पत्राद्वारे जाहीर करण्यांत येते की, ब्राह्मण लोक आमचे लोकांकडून लग्नकार्यास किंवा देवदेवतांच्या पूजाअर्च्या करण्यासमयीं आणि इतर शुभाशुभ कार्याचे वेळी मनास वाटेल त्याप्रमाणें यजमानाकडून अडवून पैसे घेतात. ह्या सर्व कारणांकरितां व प्रत्येक मनुष्यास आपापले धर्मसंबंधी कार्य करण्यास हिंदु शास्त्राची पूर्ण सत्ता असल्यामुळे आज कित्येक दिवसांपासून वर दर्शविले जातींचे लोक ह्या मुंबई इलाख्याचे कित्येक भागावर ब्राह्मणांचे (भटांचे) साह्याशिवाय वर दर्शविलेलीं धर्मसंबंधी कार्ये करीत आहेत; परंतु हें करणें भट लोकांस न आवडून व त्यांचे रक्ताचें पाणी झाल्याशिवाय फुकट मिळत असलेली उत्पन्न बुडूं पहात आहेत, हैं जाणून जुन्नर प्रांतांतील भटांनी ओतूर येथील कांहीं जोशांस पुढे करून रा. बाळाजी उर्फ काशीबा कुशाजी पाटील डुमरे, ओतूरकर यांनी आपल्या दोन मुलींची लग्नें स्वत: लाविलीं म्हणून भटांची ६ ॥ रुपये नुकसान झाली, यास्तव ती नुकसान सदरचे बाळाजी यांजकडून भरून घेण्याकरितां वामन जगन्नाथ, शंकर बापुजी, बळवंत सखाराम, रामचंद्र सदाशिव जोशी, उदास या सर्वांनी जुन्नर कोर्टात फिर्याद केली. सांप्रतचे काळास अनुसरून पहातां भटांचा कोणत्याही प्रकारचा हक्क इतर लोकांवर पोंचत नाहीं, हें न्यायदृष्टीनें उघड असून न्यायाधीश महादेव श्रीधर, सबार्डिनेट जज्ज, जात ब्राह्मण यांनीं आपले ब्राह्मण फिर्यादीचे स्वरूपाकडे पाहून ता. २९ मार्च सन १८८६ इसवी. रोजी असा ठराव केला कीं, प्रत्येक लग्नाबद्दल प्रतिवादी बाळाजी पाटील डुमरे यांनी ४ आणे म्हणजे दोनी लग्नांबद्दल ८ आणे द्यावेत असा ठराव केला. ह्या ठरावाबद्दल वरिष्ठ कोर्टात प्रतिवादी यांजकडून अपील होणें आहे व अपीलाचा निकाल लागेपर्यंत आमचे लोकांनी म्हणजे ज्यांचे येथें लग्नकार्ये होतील व जेथे भटजी किंवा ग्रामजोशी लग्न लाविण्याबद्दल हक्कानें पैसा मागतील, तेथें प्रत्येक लग्नाबद्दल मशारनिल्हे रा. सा. सबजज्ज यांच्या ठरावान्वये तूर्त चारच आणे
पान:Samagra Phule.pdf/४६०
Appearance