Jump to content

पान:Samagra Phule.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय सर्वगुणसंपन्न आमचे भालेकर, जर तूर्त व्यवहार सुधारक मंडळींत, काय आहे ? काय पाहिजे ? असें पुकारून सर्व गांवभर गवगवा करण्याचें एके बाजूला ठेवतील आणि आपल्या मुंबईकर यजमानांस वंगनी क्षेत्री ताबडतोब नेऊन त्यांजपासून आपल्या कलमी सुशिक्षणास प्रायश्चित देतील तर बरे होईल, नाहीं तर Jack of all master of none या म्हणीप्रमाणें त्यांचे सर्वच आंधळे गारुड उघडकीस येणार आहे. स. पु. क. समाप्त