अनुक्रमणिका २६१ उपोद्घात प्रकरण १ ले : सरकारी सर्व खात्यात ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्यामुळे, त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्मण आपल्या मतलबी धर्माच्या मिषानें अज्ञानी शेतकऱ्यास इतके नाडितात की, त्यांस आपली लहान चिटुकली मुले शाळेत पाठविण्याची साधने राहात नाहीत व एखाद्यास तसे साधन असल्यास त्यांच्या दुरुपदेशाने तशी इच्छा होत नाही. प्रकरण २ रे : सरकारी गोरे अधिकारी हे बहुतकरून ऐषआरामात गुंग असल्यामुळे त्यांस शेतकऱ्याचे वास्तविक स्थितीबद्दल माहिती करून घेण्यापुरती सवड होत नाही व या त्यांच्या गाफिलपणाने एकंदर सर्व सरकारी खात्यांत ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असते, या दोन्ही कारणांमुळे शेतकरी लोक इतके लुटले जातात की, त्यांस पोटभर भाकर व अंगभर वस्त्रही मिळत नाही. प्रकरण ३ रे : आर्य ब्राह्मण इराणातून कसे आले व शूद्र शेतकरी यांची पूर्वपीठीका व हल्लीचे आमचे सरकार एकंदर सर्व आपले कामगारांस मन मानेल तसे पगार व पेनशने देण्याचे इराद्याने नानाप्रकारचे नित्य नवे कर शेतकऱ्यांचे बोडक्यावर बसवून त्यांचे द्रव्य मोठ्या हिकमतीने गोळा करू लागल्यामुळे शेतकरी अट्टल कर्जबाजारी झाले आहेत. प्रकरण ४ थे : शेतकऱ्यांसहित शेतकीची हल्लीची स्थिती. प्रकरण ५ वे : आम्हा शूद्र शेतकऱ्यांसंबंधी भटब्राह्मणांस सूचना व सांप्रत सरकारने कोणकोणते उपाय योजावेत. हा असूड लिहितेवेळी कित्येक गृहस्थांचे व माझे यासंबंधी बोलणे झाले, त्यापैकी नमुन्याकरिता दोन मासले दिले आहेत - खासा मराठा म्हणविणारा कबीरपंथी शूद्र साधू
पान:Samagra Phule.pdf/३०२
Appearance