Jump to content

पान:Samagra Phule.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करण्याची गरज नाही

२५८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय २८ ऑक्टोबर १८८३ च्या दीनबंधूच्या संपादकीयातील काही मजकूर उद्धृत केला होता. त्यांत लोखंड्यांनी म्हटले होते. " मे. जोतीराव यांनी मोठी मेहनत घेऊन जे शेतकऱ्यांचे उन्नतीस्तव प्रकरण तयार केले आहे ते वाजवीपेक्षा फाजील झाल्या कारणाने लाभापेक्षा तोटा होण्याचा विशेष संभव आहे. ह्या निबंधाचे दोन भाग आमच्या पत्रात पूर्वी प्रसिद्ध होऊन गेले त्यांचे आणि ह्या तीन भागांचे लक्षपूर्वक अवलोकन केल्याने त्वरित दिसून येईल की, हे तीन भाग फारच कडक रीतीने लिहिले गेले असून ह्यापासून (लायबल) अब्रु घेतल्याचा खटला सहज उत्पन्न होणारा आहे असे आम्हास खास वाटते. ईश्वरकृपेने हे तीन भाग आमचे पत्रात न येण्याविषयी ज्या आडकाठ्या आल्या त्या उत्तमच होत व त्याबद्दल जगदीशाचे आम्ही आभार मानतो.