Jump to content

पान:Samagra Phule.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय राहण्याची ठिकाणें "सत्यशोधक समाजाचे चिटणीस पेठ वेताळ" या पत्त्यावर ता. २० माहे मे सन १८७७ ईसवीच्या आंत कळवावें. नॉट पेड पत्रे घेतली जाणार नाहींत. प्रत्येक उमेदवारांस निबंध वाचण्यास अथवा भाषण करण्यास पांव तास दिला जाईल, परंतु विषयरचना योग्य दिसल्यास यापेक्षां अधिकही वेळ दिला जाईल. उमेदवारांचे वय सोळा वर्षांपेक्षां कमी नसावें. एकाच उमेदवारांस दोन विषयांवर निबंध लिहून वाचण्याची व भाषण करण्याची परवानगी नाहीं. या दोन्ही विषयांवर निबंध लिहिणारे व भाषण करणारे यांनी कोणत्याही व्यक्तीस प्रत्यक्ष किंवा परोक्ष रीतीने अनुलक्षून लिहूं व बोलूं नये. राजकीय विषयावर कोणी उमेदवार लिहिल किंवा बोलेल तर त्याचे भाषण लागलीच बंद केलें जाईल. निबंधाच्या व भाषणाच्या परीक्षेकरितां पंच नेमण्यांत येतील. ते ज्यांचे निबंध व भाषणे पसंत करतील त्यांपैकी प्रत्येक विषयांत उत्तम निबंध व भाषण करणारांस चार बक्षिसे दिली जातील. त्यांचा तपशील. निबंध लिहिणारांस पहिलें बक्षीस २५ रु. चे व दुसरें ५ रु. चे. भाषण करणारास पहिलें बक्षीस कैलासवासी रा. रा. जाया यल्लाप्पा लिंगू यांच्या नांवाचें १० रु. चें व दुसऱ्यास ५ रु. चें याप्रमाणे एकंदर चार बक्षिसे ठेविली आहेत. पहिल्या प्रतीचे म्हणजे रु. २५ व १० चें मिळण्यास १०० गुणांतून ५० गुण व दुसऱ्या प्रतीचीं पांच पांच रुपयांची दोन मिळण्यास निदान ४० गुण आलें पाहिजेत. Jotirao Govindrao Phooley सत्यशोधक समाजाचे चिटणीस. ता. २० माहे मार्च सन १८७७ ई. --समाप्त-