पान:Samagra Phule.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रथम आवृत्तीची प्रस्तावना "महात्मा फुले : समग्र वाङ्मय" वाचकांच्या हाती देण्यास आम्हास आनंद वाटतो. म. जोतीराव फुले यांच्या एक दोन पुस्तकांखेरीज बाकीची पुस्तके किंवा पुस्तिका बरीच वर्षे दुर्मिळ झाल्या होत्या. 'गुलामगिरी' व 'सार्वजनिक सत्य धर्म' पुस्तक यात जोतीराव फुले यांचे धर्म, संस्कृती, इतिहास, हिंदुधर्मावरील प्रखर हल्ला, नवी मानवतावादी ध्येये, बहुजन समाजाची दुःस्थिती व त्यातून बाहेर पडण्याचे उपाय, सर्व मानवव्यापी सत्यधर्माचा विचार आणि मानवाचे मौलिक व अंतिम ऐक्य या सर्व मुद्द्यांचे विवरण सापडते. त्यांची काव्यरचना ही मुख्यतः वर उल्लेखिलेल्या विचारांच्या प्रचारार्थच निर्माण झालेली आहे. "छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा' डफाच्या धुमाळीत उठावदार दिसेल इतका चांगला असला तरी त्यातही वरील मुद्द्यांच्या प्रचारांचा उद्देश दुसऱ्या कडव्यामध्ये कडव्या भाषेत प्रकट झालेला आहे. "सत्यशोधक समाजोक्त पूजाविधी' व 'इशारा' या पुस्तिका जुन्या ग्रंथालयातील जुन्या पुस्तकात मिळत होत्या. परंतु 'ब्राह्मणांचे कसब', 'शेतकऱ्याचा असूड', 'सत्सार' (अंक १ व २), 'हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन' हे साहित्य फार प्रयासाने मिळवावे लागले. 'अखंडादि काव्यरचना' थोड्याबहुत प्रमाणात 'सार्वजनिक सत्य धर्म' पुस्तकाच्या अखेरीस छापल्यामुळे वाचावयास मिळत असे. जोतीराव फुले यांच्या चरित्राची अनेक पुस्तके अनेकांनी लिहिली आहेत. त्यातील श्री. धनंजय कीर यांच्या "फुले चरित्रा" शिवाय इतर पुस्तके चरित्राबरोबरच प्रचाराच्या उद्देशाने लिहिली गेली आहेत. काही चरित्रकारांनी ब्राह्मणेतरवादाच्या मुळाशी असलेला अंतिम ध्येयवाद बराचसा डोळ्याआड केल्यामुळे त्या चळवळीला १९१९ च्या सुमारास स्वराज्य चळवळीच्या विरोधीही वळण लागले होते. “महात्मा फुले : समग्र वाङ्मय' हा संग्रह त्याच्या मूलभूत ध्येयवादाकडे वाचकांचे लक्ष वेधील अशी आम्हांस आशा आहे. विसाव्या शतकाच्या मध्यकालात निर्माण झालेल्या भारतीय प्रजासत्ताक राज्याचे अधिष्ठान म्हणून आवश्यक असलेल्या आणि मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावर निर्माण झालेल्या "