पान:Samagra Phule.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना त्या लहानशा चोपडीला मोठी प्रस्तावना लिहिण्याची गरज नाही. आमच्या देशांत ब्राह्मणांचे महत्त्व किती आहे व ते धर्माच्या मिषांने लोकांवर केवढा जुलूम करितात हे प्रसिद्धच आहे. असे असतां कोणी ह्मणतील की, हे पुस्तक रचण्याचे कारण काय ? तर त्यास असे उत्तर आहे की, ब्राह्मण आपला कावा सर्व जातींच्या लोकांसी सारखा चालवीत नाहीत. कुणबी, माळी वगैरे शूद्र लोकांत त्यांचे भटपण फार चालते, आणि ते इतर जातीच्या व विशेषेकरून सांप्रतकाळच्या सुधारलेल्या लोकांस फारसें ठाऊक नाही. जे विद्या शिकून सुधारले आहेत त्यांच्यामध्ये भटजीबुवांचे महात्म्य दिवसानुदिवस कमी होत चालले आहे; परंतु अशी गोष्ट शूद्र जातीत नाही. तेथे अद्यापि बाजीरावाच्या वेळची भटशाई राज्य करीत आहे. अशा लोकांस त्यांच्या बंधनातून सोडवावे म्हणून रा. जोतिबांनी हा अल्प प्रयत्न केला आहे. त्यांचा दुसरा एक हेतु हा आहे की, आमच्या समदृष्टि इंग्लीश सरकारने आपल्या प्रजेतील या अति-उपयोगी वर्गास विद्या शिकवावी व तिच्या योगे त्यांचे डोळे उघडून त्यांस भटांच्या दास्यत्वांतून मुक्त करावें. हे हेतु सिद्धीस गेले असतां ग्रंथकर्त्यांचे श्रम सफळ होतील. B. P. 00 एच २२ 90