पान:Samagra Phule.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मणांचे कसब " नवी पुस्तके " या सदराखाली "ब्राह्मणांचे कसब' या पुस्तिकेवर अभिप्राय देताना सत्यदीपिकाकर्ते बाबा पदमनजी यांनी म्हटले होते "रा. जोतिबा गोविंदराव फुले यांनी "ब्राह्मणांचे कसब' या नावाचे पुस्तक छापून प्रसिद्ध केले आहे. रा. जोतिबांनी आपले पुस्तक स्वदेशीय कुणबी, माळी, मांग, महार यांस अर्पण केले आहे. रा. जोतिबांनी ब्राह्मणाच्या कसबाचे यथार्थ वर्णन केले आहे. त्यात काही अतिशयोक्ती नाही. ज्यांस भटपणाची फारशी माहिती नाही व ज्यांचे वागणे कुणबी, माळी लोकांत नाही त्यांस कदाचित या पुस्तकात कवीने आपले कसब चालविले आहे असे वाटेल परंतु आम्हास जी काही भटपणाची माहिती आहे त्यावरून तर हे खरोखर ब्राह्मणाचेच कसब वर्णिले आहे असे वाटते. ब्राह्मणाचे कसब दोन आण्यात मिळते (पुणे, वेताळपेठ, कर्त्याचे दुकान)" (पहा. “सत्यदीपिका", वर्ष १०, अंक १, जानेवारी १८७०) 00