पान:Samagra Phule.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५ विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी "विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी' हा पवाडा “सत्यदीपिका" मासिकाच्या जून १८६९ च्या अंकात (पृ. ८६ ते ९२) पवाडा (लिहून पाठविलेला) या मथळ्याखाली प्रथम प्रकाशित झाला होता. केंब्रिज विद्यापीठातील एक संशोधक डॉ. रोकेंलिंड ओ'हॅनलन यांनी तो धुंडाळून “पुरोगामी सत्यशोधक' या त्रैमासिकाच्या जानेवारी ते मार्च १९८४ च्या अंकात पुन्हा प्रसिद्ध केला. महात्मा फुले समग्र वाङ्मयाच्या सुधारित तृतीयावृत्तीत या पवाड्याचा समावेश करताना सत्यदीपिकाकर्त्यांनी दिलेल्या तीन तळटिपा गाळण्यात आल्या होत्या. त्या खालीलप्रमाणे :- (१) महाअरिच्या पोरा शिकविणे विटाळ मानीती । इंग्रजा शेकह्यांड करिती ॥ या फुल्यांच्या पवाड्यातील शब्दापैकी “महाअरीच्या' या शब्दावर तारांकित चिन्ह असून तळटिपेत त्याचा अर्थ “महाराच्या' असा असल्याचे सत्यदीपिकाकर्त्यांनी म्हटले होते. (२) पवाड्याच्या शीर्षकावरही त्यांनी तारांकित चिन्ह दिले होते आणि म्हटले होते, “सर्व ब्राह्मण पंतोजी या पवाड्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत असे आमचे मत नाही, तथापि सरकारास जो दोष दिला आहे तो बहुतांशी खरा आहे. ज्या रयतेकडून सरकार विद्येची पट्टी घेते तिच्या मुलांस विद्या शिकविण्याची जशी सोय व्हावी तशी अद्याप झाली नाही." (३) शिकवा क्लास पंतोजीचे । निवळ माळ्या कुणब्यांचे । दुसरे महार मांगाचे । या ओळीवर तारांकित चिन्ह असून तळटिपेत “आमच्या मते सर्व जातींची मुले एका ठिकाणी शिकवावी' असे सत्यदीपिकाकर्त्यांनी म्हटले होते. 00