मामेसासूबाई, ह्या तुझ्या मावससासूबाई, हे तुझ्या नवण्याचे मामा, हे काका ह्या वन्सं...’’ अशी एकामागून एक ओळख चालली होती, व मी दरवेळी खाली वाकून नमस्कार करीत आशीर्वाद घेत होते. मनातल्या मनात मी म्हटले, ‘‘इतक्या थोरल्या अनोळखी माणसांचे मुके घेण्यापेक्षा नमस्कार
करण बर आहे!
बर्लिनहून मी अधूनमधून एखाद-दोन दिवस लाइझिगला येत असे, पण सबंध सुटीभर राहावयास अशी जवळजवळ वर्षाने आले. एवढ्या अवधीत रीया (थोरली सून)ला छानसे बाळ झाले होते. मी तर आता अगदी घरचीच झाले होते. आल्याबरोबर म्हटले, “गडे रीया, तुझं बाळ गुलाबी
गुलाबी, लठ्ठ-लठ्ठ, मऊ, लुसलुशीत! पाहिले की वाटे. संबंध खावे. मी चटदिशी तान्हुल्याला उचलले, हृदयाशी धरले व पटापट त्याच्या गालाचे मुके घेतले. थोड्या वेळाने मला वाटले, आपले काहीतरी चुकले! सारी मंडळी कशी काही धक्का बसल्यासारखी स्तब्ध होती. रीथाने बाळ माझ्या
हातून घेऊन बिछान्यावर ठेवले, व आम्ही खोलीबाहेर पडलो. नेहमीप्रमाणे हसतखिदळत जेवणे झाली. दुपारी मी रीयाला विचारले की, सकाळी माझे काही चुकले की काय? तिने माझा हात धरून स्नेहपूर्ण स्वराने सांगितले, “हे बघ बाई, एखादं बाळ पाहिल्यावर असे मुके घेऊ नयेत. आमच्यात ते
बरं समजत नाहीत. आज तू सकाळी आपल्या इथे केलंस तर फारशी हरकत नाही, पण लोकांकडे नको हो असं करूस! लहान मुलं ही फुलांसारखी असतात. त्याच्या प्रकृतीला फार जपावं लागतं. मोठ्या माणसानं आपलं तोंड तान्ह्या मुलांजवळ नेऊ नये, नाहीतर पडस, खोकला, क्षय, इत्यादी
संसर्गजन्य रोग त्याला होतील. मी सांगितलं ह्याचा राग नाही ना आला तुला?’’ ‘छेः! छे:! मी हसून म्हटले व मला राग आला नाही ह्याची खात्री पटवण्यासाठी अगदी त्यांच्या पद्धतीने तिच्या लढू गोया गालांचे सशब्द
चुंबन घेतले!
दोन वर्षे तेथे राहून मला वाटले आता पुष्कळच प्रगती झाली आहे. कोणी बायांनी माझा मुका घेतला तर मी गाल पुसून टाकीत नसे. कोणी पुरुषांनी हाताचा मुका घेतला तर तोंड वाईट न करता व लगेच हात न धुता मी तशीच बसन राहात असे . पण मला अजूनही एक आश्चर्याचा धक्का
बसायचा होता. भाझर नवरा विलायतेला आला होता, व आम्ही दोघे मिळून स्वदेशी परत यावयास निघालो होतो त्या वेळची गोष्ट. आम्ही आगगाडीत
पान:Paripurti.pdf/9
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
परिपूर्ती / ११