पान:Paripurti.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १००
 

जाणीवेशिवाय येणे शक्य नव्हते. जो भूतकाळ आपण जगत असतो तो सध्याच्या क्षणाला लागून अर्धा होऊन गेलेला असतो असे मुळीच नाही. हा क्षणबिंदू त्याच्या अलीकडच्या क्षणबिंदूशीच संलग्न असला पाहिजे ही कल्पना अवकाशबिंदूंच्या तुलनेवरून उचलली असते. वर्तमानातील कालबिंदू भूतकालात कुठल्याही कालच्छेदाशी एकत्व पावेल. फक्त आताच्या व त्या वेळच्या संवेदनात एकात्मता असली पाहिजे. अगदी हेच तत्त्व क्रोचेने आपल्या इतिहासाच्या विवेचनात दिले आहे, तो म्हणतो, "मानवेतिहासाचे कित्येक कालखंड पार विसरून गेलेले असतात- इतिहासाच्या पुस्तकात सनावळ्यात व बखरीतून ते बिचारे मूक, निर्वासित जावन कठीत असतात. पण कुठच्या ना कुठच्या तरी नव्या पिढीच्या जावनात त्यांना सहसंवेदना मिळून पुनर्जन्म मिळतो व ते परत नवचैतन्याने स्फुरतात. प्रत्येक पिढी आपल्या जीवनाशी एकात्म असलेल्या गतकालाला- गतेतिहासाला- जिवंत ठेवीत असते, वर्तमानात आणीत असते. मनुष्ययुगाचा धार्मिक अंधश्रद्धेचा काल संपून युरोप शास्त्रीय प्रगतीच्या मार्गावर आले तेव्हा थडग्यात दीर्घ निद्रा घेणारा ग्रीक व रोमन इतिहास खडबडून जागा झाला; आणि रानटी, मागासलेल्या समजल्या लल्या मध्ययुगीन इतिहासाला बायरन, शेले, आदीकरून कवींनी उजळ दिला."
 आपली कालसंवेदना निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या प्रकारची असते- पण एक वैशिष्ट्य म्हणजे ती दुहेरी असते. एकाच वेळी निरनिराळ्या कालसवेदना आपण अनुभवीत असतो. वर्तमान क्षणाचा अनुभव घेणारा एक भाग व त्या अनुभवाची नोंद वा निरीक्षण करणारा दुसरा भाग अशी सवदनाची तहा असते. दुसरीचा गणिताचा तास आज पस्तीस वर्षांनी अनुभवणारी मी; एकीकडून गौरीचा गोंधळ दिसणारी मी आणि आज चाळीस वर्षांची मी ह्या सर्व तिन्ही 'मी'च्या अनुभवाची नोंद करणारे एक खा उदासीन पृथगात्म मीपण असते, आणि ह्या पृथगात्म मीची कालगणना काही निराळीच असते. ह्या मीला स्वत: कालातीत असल्याची जाणीव असते, व बाकीच्या सर्व मीचे जीवन निरनिराळ्या कालप्रवाहात झपाट्याने वाहत असल्याची जाणीव असते. म्हणजे निरनिराळ्या व्यक्तींचा काळ निरनिराळा असतो. एवढेच नव्हे तर एकाच व्यक्तीला एकाच वेळी