पान:Paripurti.pdf/84

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


परिपूर्ती । e७ अवकाशाचे अत्यल्प परिमाण बिंदू हे आहे. ह्या बिंदूला अवकाशात स्थान असते. पण लांबी-रुंदी-उंची नसते. त्याचप्रमाणे कालाचे अत्यल्प परिमाणही बिंदुमात्रच आहे. आपल्याला अवकाशाची वा कालाची जी संवेदना होते ती मात्र कधीही बिंदुमात्राची नसते. अवकाशाची संवेदना डोळ्यांनी व शरीराच्या हालचालींनी होते, व दर वेळी ती संवेदना ज्याला लाबी नाही, रुंदी नाही, अशा रोडक्या अवकाशाची नसून लांबी, रुंदी व खाली ह्या तीन परिमाणांबरोबरच रंग व प्रकाश ह्यांनी भरगच्च भरलेली व भावनांनी जिवंत अशी असते. हा संवेदित अवकाश बिंदू-बिंदू मिळून झाला असे मुळी आपल्याला कधीच प्रत्यक्षपणे कळत नाही. जशी अवकाशाची वपना साकार, सवर्ण असते तशी कालाची संवेदनासुद्धा नेहमीच घटनांनी तला, भावनांनी प्राणलेली अशी होते. फार काय, आपल्याला काळाची "" होत नाही. आपण काळ जगत असतो व घटना अनुभवीत असतो. कष्टया अवकाशाच्या प्रत्येक बिंदच्या मागे. पुढे, वर, खाली अवकाशाचे १५ असतात, संवेदनात्मक अवकाश नेहमीच एक मोठा तुकडा असतो व त्याच्या अवतीभोवती अंधक जाणलेली पण पर्ण संवेदित न झालेली अशी अवकाशाची संबंध अस्पष्ट मर्यादा असते. त्याचप्रमाणे, सवेदनात्मक काळ ९ नमाचे एक मोठा छेद असतो व त्याच्या पुढचा-मागचा काळ अधुकरीत्या त्याला मर्यादा म्हणन जाणीवेत असतो. बिंदुमय अवकाश व त्याचे योगाने मोजलेला बिंदमय काळ ह्यांच्यातील प्रत्येक बिंदू इतरापासून 'पाग असतो- प्रत्येक बिंदू एकापुढे एक असतो. प्रत्येक क्षण गेलेल्या क्षणाच्या पुढे व येणाच्या क्षणाच्या मागे असतो. पण संवेदित दिक व संवेदित ल हा पुजरूप असल्यामळे त्यात पुढचे व मागचे ह्या मर्यादा पुसट STS असतात. साकार, सवर्ण अवकाशात आकाराची व वणीचा १९५म होते. त्यात अमके मागे, अमके पृढे असे नसते. त्याचप्रमाणे घटनात्मक कालाचा प्रत्येक तुकडा भूत, वर्तमान व भविष्य मिळून झालेला असतो. संवेदित कालाच्या प्रत्येक क्षणावर मावळत्या भूतकाळाची छाया व उगवत्या भविष्याचे अरुणकिरण दाट पसरलेले असतात. आपल्या संवेदनेतील काल हा भूत, वर्तमान व भविष्य ह्या तीन परिमाणांचा बनलेला असतो. वर्तमानाच्या जाणिवेत भूताचा वा भविष्याचा किती लांब तुकडा येईल हे अर्थातच संवेदनेवर अवलंबून असणार. प्रत्येक क्षणाची लांबी-रुंदी