Jump to content

पान:Paripurti.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१० / परिपूर्ती
 

ती वरील वाक्य बोलली. म्हातारी म्हणजे एक लहानशीशी, नाजुक-साजुक, बाहुलीच होती जणू. तिचे पांढरे शुभ्र केस, गोरा-गोरा वर्ण, किंचित सुरकुतलेले तोंड, तिचा नीटनेटका श्रीमंती पोशाक- मागच्या पिढीचा नमुना म्हणून संग्रहालयात ठेवण्याजोगी होती ती. मी स्नेहभराने तिच्या खांद्यावर हात ठेवला व आश्चर्याने विचारले, “पण आजी, मी केलं तरी काय? तुला रागवायला झालं तरी काय?", म्हणे रागवायला काय झालं? तू आल्या दिवसापासून मी पाहते आहे, तुझा मुका घेतला की तू ताबडतोब गाल पुसून टाकतेस. इतकी का तुला घाण वाटते? का तू ब्राह्मण म्हणून तुला विटाळ होतो?" मी चकित झाले. खरंच का मी गाल पुसून टाकीत होते? मग ही क्रिया अगदी मला नकळत होत असली पाहजे. ‘‘मी जाणूनबुजून नव्हते गं तसं करीत. मी थोडी थांबले व पुढे म्हणाले, “किनी आमच्यात अशा चाल नाही. नकळत अपराध झाला. तुझा अपमान करणे माझ्या स्वप्नातसुद्धा येणार नाही हो! त्यातून तू तर नवण्याची आजी म्हणजे तुला केवढा मान द्यायला पाहिजे!’ म्हातारीचे एवढ्यावर समाधान झालेती चौकस होती व वाचणारीही. हिंदू रीतिरिवाज, नातीगोती, तिला थोडथोडी माहीत होती.आम्ही हातात हात अडकवून घरात जात असताना तिने विचारले, "काय ग, तुझ्या सासूनं तुझा मुका घेतला तर काय करतेस गं?" तिच्या प्रमाने मला हसूच लोटले. मी म्हटले, ‘‘माझी सासू तर मुका घेणार नाहा, पण माझी आईसुद्धा एवढ्या मोठ्या लेकीचा मुका घेणार नाही. आता चकित होण्याची तिची पाळी होती.
 ह्यानंतर काही दिवसांनी मी लाइपज़िगला गेले. तेथे ज्या कुटुंबात माझा नवरा राहिला होता तेथे मी महिनाभर राहावयाची होते. कुटुंबवत्सल घर होते. वृद्ध आईबाप व पाच मुलगे आणि चार मुली असा मोठा परिवार होता. मी गेल्यावर वृद्ध जोडप्याने व मुलींनी माझे मुके घेऊन स्वागत केल. बाकीच्यांनी सुदैवाने करपीडनावरच भागवले. थोरल्या मुलाचे नुकते लग्न झाले होते व सूनही चार दिवस राहावयास आली होती. रात्री निजायला जाताना तिने सासरच्या प्रत्येक माणसाचा निरोप घेतला. जाताना ‘‘जाते हं, आई- जाते हं, बाबा -" सासु-सासऱ्यांचा मुका घेतला. नंतर आपल्यापेक्षा लहान दिरांचा व नंतर समस्त वन्सं व शेवटी मी . माझे लग्न झाले त्या दिवसाची मला आठवण झाली. माझ्या थोरल्या जाऊबाई सासरच्या मंडळींशी माझी ओळख घालून देत होत्या. ‘ह्या तुझ्या