१
प्रेमाची रीत
तिटकारा वाटत असेल तर परत नाही हो घेणार!
दुसरी एखादी असती तर तुझ्याशी बोललीसुद्धा
नसती. पण मला तुझ्या न तुझ्या नव-याबद्दल
माया वाटते ना!' म्हातारी का संतापली मला
समजेच ना. माझे लग्न व्हायच्या आधी माझा
नवरा जर्मनीत असताना त्याने जोडलेल्या
माणसांपैकी ती होती. तो तिला आजी म्हणे,
तिने त्याला जर्मन शिकविले. त्याला परदेशात
तिचे घर म्हणजे एक आसराच होता. पुढे मी
जर्मनीत गेल्यावर त्याची बायको म्हणून तिने
एखाद्या आप्ताप्रमाणे माझे स्वागत केले. चार
ठिकाणी हिंडून चांगल्या कुटुंबात मला बिऱ्हाड
बघून दिले. बर्लिनच्या विश्वविद्यालयातील दोन-
चार अध्यापकांना भेटून माझे नाव नोंदविले. मी
जरी कितीही कामात असले तरी पंधरा दिवसांतून
एका शनिवारी संध्याकाळी तिच्याकडे जावयाचे
व जेवून परत यावयाचे किंवा तिच्याकडेच
राहावयाचे असा माझा क्रम असे. आजही मी
नेहमीप्रमाणे घंटा वाजवल्यावर तिने दार उघडून