म्हटले, "बाई, ती करवंदे होती... जांभळे नव्हती. तुम्हाला पाहिजे
असतील तर तो पहा पलीकडे माणूस उभा आहे, त्याच्याजवळ जांभळे
आहेत.” 'बरे झाले टोपली गेली' असे म्हणून तिने नवऱ्याकडून
जांभुळवाल्याला बोलावले. तो होता एक कुणबी आणि जी कातकरणीची
कथा तीच त्याची पण कथा. तो म्हणे, “मी जांभळं विकायला आणली
आहेत. टोपली नाय. हवी तर घ्या, नाहीतर मी पुढे जातो." शेवटी चरफडत
त्या बाईने रूमालात जांभळे विकत घेतली, व तो माणूस आपली जीर्ण
टोपली घेऊन निघून गेला. मला मात्र “मराठे लोकाला कसा बेपार कळत
नाही' हे पुराण मुंबईपर्यंत ऐकावे लागले.
आजही परत ते शब्द मी आणखी एका माणसाकडून ऐकत होते. हे
गृहस्थ एक सुप्रसिद्ध म्हणा की कुप्रसिद्ध म्हणा एजंट होते. कोणाला काहीही
पाहिजे असो, पुरेसे कमिशन मिळाले की आपण मिळवून देऊ अशी ह्यांची
प्रतिज्ञा होती, व त्या प्रतिज्ञेला आतापर्यंत कधीही बाध आला नव्हता; पण
आज मात्र त्यांनी हात टेकले होते. ते रस्त्यावरून अगदी मंदपणे जात होते.
त्यांचा चेहरा पाहन मी विचारले, "काय, इकडे कोणीकडे? बरे नाही
वाटत? हवा पालटायला का आलात?” “अहो, मी अगदी चांगला बरा
आहे. पण किती खटपट केली तरी काम होत नाही म्हणून त्रासलो आहे."
त्यांनी सांगायला सुरुवात केली. "ते पलीकडे...... चे रस्त्यावर एक
लहानसे घर नाही का. ती जागा व घर मी पंधरा हजाराला मागत होतो.......
नी सांगितले आहे माझ्यासाठी घ्या म्हणून." ते घर व त्या घराची मालकीण
माझ्या चांगली माहितीची होती. ती एक पांढरपेशाची पन्नास वर्षे वयाची
विधवा होती. तिच्या मुलाने आणि तिने पै-पै करून साठवून शंभर दीडशे
रुपयांना जमीन घेतली होती व तीवर काही विटा, काही पत्रे, काही
खोक्याच्या फळ्या अशी विविध सामुग्री जुन्या बाजारातून आणून एक
लहानसे घर बांधले होते. घरात राह्यला येऊन दोन वर्षे होतात तो मुलगा
वारला व सध्या घरात विधवा सासू, विधवा सून व तीन वर्षांचा एक नातू
अशी राहात होती. घरी खायची भ्रांत होती. सासू चार ठिकाणी कामे करी.
घरातल्या चार खोल्यांपैकी तीन भाड्याने दिल्या होत्या, व कुटुंबाची
कशीबशी गुजराण होत होती. मुंबईला बाँबहल्ला होणार ह्या भीतीने मुंबईचे
लोक वाटेल ते पैसे देऊन बाहेरगावी घरे व जमिनी घेत होते. आज तिची
दोन-तीन हजारांची मालमत्ता पंधरा हजारांना जात होती. ते एजंट पुढे सांगू
पान:Paripurti.pdf/67
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ७९