पान:Paripurti.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८ / परिपूर्ती
 

भाडेपट्टा करून संस्थानिकांना कसे हात चोळीत बसवले हे सांगायचे म्हणजे एक मोठा ग्रंथ होईल; पण पाटीलबुवांनी मुळातच वीज द्यायचे नाकारले का हे जाणण्याची मला उत्सुकता होती. काय परप्रांतीयांना आपल्या आळीत थारा द्यावयाचा नाही असा विचार होता की काय पाटीलबुवांचा? इतका लांब विचार शक्य दिसत नव्हता. पाटीलबुवा काही फारसे शिकलेले नव्हते, पण व्यवहाराला मोठे चतुर म्हणून त्यांचा लौकिक होता. मग त्यांनी पैसा नाकारला का? बऱ्याच दिवसांनी मला पाटलांच्या वागण्याचे रहस्य उलगडले. हे छोटे राजेसाहेब मोटारीतून उतरून पाटीलबुवांच्या बैठकीपर्यंत पायी गेले असते म्हणजे त्यांना ताबडतोब वीज मिळाली असती. पण पाटीलबुवांना बोलावून आणून मोटारशेजारी बोलणी झाली त्यामुळ पाटलांची मिजास बिघडली होती. त्यांनी चार जणांना बोलून दाखविल. "राजेसाहेबांचे बूड इतके जड झाले होते काय?... मला मोटारीची एट दाखवतो होय?-- त्याला म्हणावे, त् राजा आहेस तर मी पाटील आह- वाटेल ते पैसे दिलेस तरी वीज देणार नाही. पैसा मिळत असला म्हणज कसलाही कमीपणा किंवा लाचारी स्वीकारायला हरकत नाही हे व्यापार धोरण पाटीलबुवांना नव्हते हे स्पष्ट झाले.
 परवाचीच गोष्ट घ्या ना! आमची गाडी लोणावळ्याजवळ थांबली. डब्यातून घाईघाईने एक पारशी उतरला. त्याला ताजी जांभळे विकत घ्यायची होती. डब्याच्या खिडकीजवळ एक कातकरीण एका लहानशा चौकोनी कुरकुलीत करवंदांचे द्रोण भरून विकायला आली. तिला पाहिल्याबरोबर त्या पारश्याने घाई करून संबंध टोपली हिसकावून घेतली व हेचा दाम काय?" म्हणून विचारले. बाईने सांगितले, “आठ आणे." ते पैसे तिच्या हातावर ठेवून गृहस्थाने कुरकुली बायकोच्या हातात दिली. मी आपली जांभळे म्हणून होणारा हा करवंदांचा सौदा स्तिमित होऊन पाहत होते. दोन मिनिटे झाल्यावर बाहेरची कातकरीण म्हणाली, "बाबा, माझी टोपली दया," पारशी म्हणाला, “मग जांभळे न्यायची कशात? तुझ्या टोपलीची किंमत देतो, सांग नी." बाई म्हणाली, "छे! मला टोपली नाही इकायची." त्याने त्या एक आणा किंमतीच्या टोपलीला एक रुपया देऊ केला तरी तिचे म्हणणे एकच, “मला टोपली इकायची नाही." शेवटी त्याने रागाने संबंधच्या संबंध टोपली तिला परत दिली. तिने त्याचे आठ आणे परत दिले व वेळ खाल्ल्याबद्दल चार शिव्या हासडून ती पुढे गेली. त्या पारशिणीला मी हळूच