पान:Paripurti.pdf/65

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / ७७
 

काही अशा मोटारी सहजी दिसत नाहीत. त्यांची मोटार गेली की, रस्त्याने जाणारी मुले उभी राहून कौतुकाने मोटार बघायची. हाकणारासुद्धा ऐटीत असे. राजेसाहेबांची मोटार पाटीलबुवांच्या वाड्याजवळ आली, मोटारहाक्या खाली उतरला व वाड्यात जाऊन ‘बाहेर अमके-अमके आले आहेत. तुमची गाठ घ्यायची आहे, क्षणभर बाहेर आलात तर बरे' असा निरोप त्याने बैठकीत जाऊन सांगितला. पाटील जरा अनिच्छेने उठले व फाटकाशी आले. राजेसाहेब खाली उतरले. रामराम वगैरे झाल्यावर त्यांनी सांगितले, "हे पलीकडचे घर आम्ही घेतले आहे. तेथे वीज पाहिजे आहे. किती पैशाला तुम्ही कनेक्शन द्याल म्हणून विचारायला आलो आहे." पाटीलबुवांनी विडा चावीत संथपणे उत्तर दिले, "वा! फार छान! आपण आमचे शेजारी होणार- आनंद आहे आम्हाला. पण वीज काही तुम्हाला नाही बुवा देता येणार.” राजेसाहेबांनी व त्यांच्या कारभाऱ्यांनी अतिशय गळ घातली, लोकांच्या चौपट पैसे देण्याचे कबूल केले. पण पाटीलबुवांचे आपले एकच उत्तर, “छे, हो! आधीच दोन- चार घरांना दिली आहे- आमच्याच पंपाला पुरे पडत नाही- तुम्हाला नाही देता येत.” राजेसाहेबांनी हा सारी हकीकत मला सांगितली, व मराठ्यांना व्यवहारच कळत नाही म्हणून ते आपल्या मुलुखात निघून गेले. घर अंगावर पडू नये म्हणून लगेच दुसरा एक भाडेकरी पाहन वर्षाच्या कराराने त्यांना देऊन टाकले. नवी भाडेकरू बाई होती, घरात तीन-चार मुले होती. बाई राह्यला आली व हळूहळू पाटलीणबाईशी मैत्री झाली. 'एकटी बाईमाणूस, शाळकरी मुलं, राकल मिळायची पंचाईत, मुलांचा अभ्यास तरी कसा होणार? बरं, बंगल्याचं भाडं तरी किती! आणखी मी गरजू; आत वीज नाही हे मला सागितलंसुद्धा नाही हो त्यांनी- मी आपली ह्या दिवसात घर मिळतं आहे म्हणून लगेच वर्षाचा भाडेपट्टा की हो केला!" अशी बाईने आपली हकीकत पान-चारदा सांगितल्यावर पाटलीणबाईंच्या सांगीवरून कुटुंबवत्सल बालबुवानी बाईंना आपली लगेच कामकरी माणसे लावून वीज जोडून दिली.
 पंधरा दिवसांनी राजेसाहेब परत ह्या गावी आल्यावर त्यांनी बंगल्यात वाज पाहून कसे आकांडतांडव केले, नव्या भाडेकरी बाईला घर मोकळे करण्याची नोटीस कशी दिली, बाई वर्षभर कोर्टात वकील न देता स्वतः कशी भांडली, व शेवटी वर्ष संपता संपता खऱ्या घरमालकाशी तिने नवा