नाही, व ते त्यात अडकले तर मूल म्हणून त्याला कसलीही दयामया
दाखविली जात नाही. १९४२ सालची गोष्ट. जळिताचे किती खटले
माझ्यापुढे आले! तेरा तेरा-चौदा-चौदा वर्षांची पोरे स्टेशने, चौक्या,
शाळांच्या इमारती जाळीत होती! त्या जळलेल्या इमारतींपेक्षा एका उगवत्या
पिढीच्या जीवनात कालवलेल्या विषारामुळे माझे आईचे मन तळमळत होते.
त्या मुलांची नैसर्गिक घृणा, दया नाहीशी झाली होती. त्यांपैकी एकाला
विचारले, “काय रे, तुमच्या पुढाऱ्याने सांगितलेली गोष्ट तू ऐकशील का
रे!" त्याने आपली बालष्टी माझ्याकडे लावून म्हटले, "अर्थात, वाटेल
त्याचा खून करावयास सांगितले तरी करीन.” माणुसकीची मूल्ये
मिळवायला हजारो वर्षे लागतात, ती धुळीला मिळवायला एक पिढीसुद्धा
लागत नाही!
"ला इलाहा इल्लिल्लाह, मोहमद रसूल्लिल्लाह!" अल्ला एकच आहे आणि
महंमद त्याचा प्रेषित आहे! काय भयंकर तत्त्वज्ञान! सबंध मानवतेच्या अंगी
आज तेच विष भिनले आहे. अल्लाचा प्रेषित जो महंमद त्याचे जो ऐकत नाही
तो मरणास योग्य आहे, त्याचा नायनाट झाला पाहिजे. हेच ब्रीदवाक्य आज
सर्व पक्षांचे आहे, फक्त 'महंमद रसूल्लिल्लाह' ऐवजी 'गांधी रसूल्लिल्लाह,
'स्टालिन रसूल्लिल्लाह' व 'गोळवलकर रसूल्लिल्लाह' हे शब्द घातले म्हणजे
झाले! ह्या प्रेषितांच्या विरुद्ध एक शब्द कोणी बोलता कामा नये. ह्याच्या
चिन्हाचा कोणी अनादर करता कामा नये. प्रत्येकाने ह्यांपैकी कोणातरि
एकाच्या पंथाचे असले पाहिजे. गांधीवादी म्हणतात, “देशभक्त काय ते
आम्हीच, इतर देशद्रोही आहेत, विनाशक आहेत, त्यांचा नायनाट केला
पाहिजे." हेच शब्द स्टालिनवादी उच्चारतात, व तेच आर.एस.एस.वाल
उच्चारित असणार. माझ्यासारख्या अनेक दैवतवादी हिंदू संस्कृतीत
रूजलेल्या व ह्या वादाने भांबावलेल्या मनाला वाटते, एकाचाच आग्रह का?
सगळेच राहीनात! कोणी कोणावर जुलूम नाही केला म्हणजे झाले!
आम्ही लहानपणी कडक वैष्णव व शैव लोकांना हसत असू. नेसणे,
कक, उपासतापास काय, पण केससद्धा वैष्णव व शैव निरनिराळ्या पद्धतीने
काढीत! पण आजच्या ह्या आधनिक एकेश्वरीवादापढे बिचारे शैव व
वैष्णवसुद्धा फिके पडतील. आमच्या आळीत मागे सर्व मले शाळेतून आली
की एकत्र खेळत, पण आता ते सर्वस्वी अशक्य झाले आहे. खेळाच्या
जागेवर काठी उभी असते, त्यावर पक्षाचे निशाण असते, खेळाच्या
पान:Paripurti.pdf/51
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८ / परिपूर्ती