पान:Paripurti.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६ / परिपूर्ती
 

पक्षोपपक्षांची, जातीपातींची पर्वा न करता साधारण मानव्याची तरफदारी करणारे आता भारतात कोण राहिले आहे? आधी माणुसकी आणि मग पक्षाचे राजकारण अशी वृत्ती ठेवणारे हे लोक गेले म्हणजे आमचे काय होणार? इंग्रजांच्या घरच्या राजकारणातील लोकशाहीची तत्त्वे नेमस्त पुढाऱ्यांनी खरी आचरणात आणली. त्यांची लोकसेवा पक्षातीत होता- कोणत्याही पक्षाशी केव्हाही लोककल्याणासाठी सहकार्य करण्यास त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. काँग्रेसच्या लोककल्याणासाठी सहकार्य करण्यास त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. काँग्रेसच्या स्वातंत्र्य संपादनाच्या मार्गाचा निषेध करूनही प्रत्येक वेळी तुरुंगात गेलेल्या काँग्रेस पक्षीय लोकांसाठी खटपट ह्या लोकांनी केली. सरकारच्या प्रत्येक प्रतिगामी धोरणाचा निषेध त्यांनी न चुकता व्यक्त केला. 'सरकारचे पित्त्ये', 'देशद्रोही' अशा सर्व त-हेच्या शिव्या खाऊनही त्यांनी रागाच्या भरात किवा सत्तेच्या लालसेने स्वजनद्रोह व लोकशाही तत्त्वांशी द्रोह केला नाही. त्यांचे राजकारण अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांचे लिखाण बहुजन समाजाच्या वृत्ती थरारून सोडण्यासाठी नसून बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी होते. त्यानी आपल्या शहाणपणाची प्रौढी मारली नाही. देशभक्तीचे प्रदर्शन केले नाही- मुद्दाम तर ते कधीच नव्हते; अशा विद्वान, सर्वसंग्राहक वृत्तीच्या माणसाना आजच्या समाजात स्थान नाही म्हणन मी हळहळते आहे. आज ते असते तर कम्युनिस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांची मत अमान्य असतानाही ह्या लोकांच्या विनाचौकशी तुरुंगवासाविरुद्ध त्यांनी निषेध प्रदर्शित केला असता. त्यांच्यापैकी एकाने तरी कौन्सिलात प्रश्न विचारला असता की, “आज भारतात विनाचौकशी किती लोक तुरुंगात आहेत? किती संस्थांना न्यायालयासमोर चौकशी न करता बेकायदा ठरवले आहे? किती वर्तमानपत्रांवर बंदी घातली आहे?" पूर्वी सरकारचा केवळ शाब्दिक निषेध करणारे म्हणून ह्या लोकांची हेटाळणी होत असे. पण आजच्या स्वराज्यात शाब्दिक निषेधही करण्याची कोणाची प्राज्ञा आहे का?
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेकायदा ठरवला त्या दिवशी माझ्या आळखीच्या एका लहान मुलाला काय आनंद झाला! मला नवल वाटले, पण मी काहीच बोलले नाही. तोच लहान मुलगा दसऱ्या दिवशी संतापलेला असा माझ्याकडे आला व सरकारला शिव्या देऊ लागला. "का रे बाबा आज काय झाले?" तर त्याने सांगितले की, “सरकारने दलावर बंदी