पान:Paripurti.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


मारीकुट्टी

'गाडी स्टेशनात उभीच होती. शोधता

शोधता बायांच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यावर
माझ्या नावाची चिठ्ठी आढळली व मी दार उघडून
आत शिरले. सामान वगैरे लावून झाल्यावर
बरोबरच्या गृहस्थांना निरोप दिला व पुढच्या
चोवीस तासांच्या माझ्या वसतिगृहात सभोवार
पाहिले. आणखी दोन बाया डब्यात होत्या- एक
मध्यम वयाची व एक तरुण. ती तरुण बाई
पोचवायला आलेल्या गृहस्थाशी जोरजोराने
हातवारे करीत, मधूनमधून हसत, हसत कुठच्या
तरी द्रविड भाषेत बोलत होती. एवढ्यात शिटी
झाली, गाडी हलली व थोड्याच वेळात आम्ही
मद्रासचे स्टेशन मागे टाकले. त्या तरुण बाईने
माझ्याकडे वळून विचारले, “वेय्यर गोय्यिंग?"
मी म्हटले, “कोचीन." लगेच तिने टाळी
वाजवली व त्या वयस्क बाईकडे वळून म्हणाली,
“आऊ फन्नी! वि आर आल्ल गोय्यिंग सेम
टौन!" मद्रासहून कोचीनकडे जाणाच्या गाडीच्या
एका डब्यात कोचीनला जाणारी तीन माणसे
असावीत ह्यात नवल काहीच नव्हते. पण तिला
तसे वाटले खरे! ती मनापासून हसली व तिच्या

काळ्याकुट्ट चेह-यावर तिच्या पांढ-या शुभ्र