Jump to content

पान:Paripurti.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


बीज-क्षेत्र


'माझी लेक नवच्याशी भांडून त्याला काही

न कळवता घरी आली होती. नवरा मारतो व
सासू सारखी उणेदुरे बोलते असे ती सांगत होती.
मी जी संध्याकाळी कामावरून घरी येते तो
धाकटीने दाराशीच सांगितले, “आपली ताई
आली आहे." पाठोपाठच मैना आली, माझ्या
पाया पडली, व मला मिठी मारून, “बाई, आता
माझं कसं होणार?" म्हणून रडली होती. ती शांत
झाल्यावर मी पण बैठकीच्या खोलीतच लवंडले.
ती एकीकडे आपल्या एका वर्षाच्या अचपळ
मुलामागे धावत होती व एकीकडे मला घरची
हकीकत सांगत होती. मुलगा नुकताच
चालायला लागला होता. तो क्षणोक्षणी पडे, जरा
तोंड वाकडे करी, की परत उभा राहून डुलत
डुलत चालू लागे. तिने त्याला धरून ठेवले की,
सुटून जायची धडपड करीत डोके आपटून घेई.
असा प्रकार चालला होता. मी म्हटले, “कमाल
आहे बाई, तुझ्या गुंड पोराची! एवढ्यात दहादा
लागलं, पण स्वस्थ काही बसत नाही"
"त्याच्यावर तर किती भांडणं होतात! काल
त्याला पाजायला घेतला तर तो अशीच मस्ती

करीत होता, आणि एकदम उसळी मारलीन तर