पान:Paripurti.pdf/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


३२ / परिपूर्ती
 

त्याचे हसणे सति मजली त्यांचे बोलणे मोठ्यांदा; ज्याला मध्यम स्थितीतील लोंक पापभीरूपणा म्हणतात त्यांचा अभाव, स्वभावाने दुष्ट व क्षुद्र महत,पण एकदा शत्रुत्व आले तर शाब्दिक व वेळ पडल्यासं शारीरिक हल्ला करण्यास मागेपुढे न पोहणारे असे होता साहित्यगुणही त्यांच्यात होते माझ्याशी बोलणाऱ्या बाईवर त्यांची छाप पडावी ह्यात काहीच नवल नव्हते: पण बायका बोलायला लागल्या म्हणजे गोष्टी निधायच्याच. ह्या गप्पा झाल्यावर तिने मला विचारले, "मल किती? केवढी आहेत? तुमच्याशिवाय राहतात का? मीही पण तींच'चौकशी केली. बाई उत्तरली, "मला मुलांनाहीत"खरंच, तमंचं लग्न झालं नसेल नाही!" "छे! माझं लग्न झाल्याला झाली चांगली सहा वर्ष!" ती म्हणाली, उगीच आपण मुलाबद्दल प्रेक्षा विचारले असे वाटून मी गप्प बसले. थोडा वेळ थांबून बाई आपणहूनच म्हणाली मी माझ्या नवऱ्याबरोबर राहात नाही तरीसुद्धा पुढे प्रण विचारण्यांचा धीर मला होईना. तिलाच काय वाटले कोणास ठाऊक, ती आपली हकीकत पुढे सांगू लागली, “माझे आई-वडील वारले व माझ्या एका 'चुलत्यान मला वाढवलं. मी मॅट्रिक झाल्यावर माझ्या मनात नसताना सुद्धा त्यांना माझा लग्न करून दिल" तुमच वजमान अशिक्षित आहेत होय मी विचारले! छे!छे! चांगले एम. ए. पीएचडी आहेत: पण माझ मनच त्याच्याकडे ओढल जाईना. मी मनात म्हंटले, कालिदासीनच मुळी तरुण मुलीनी मोकळीक दिली आहे. ना 'तो काही विलोभनीय नव्हता असे नाही-तिला काही समजत नव्हते असेही नाही. पण तिला तो नाही आवडला झाले! कारण व्यक्ती तितक्या प्रकृती अस म्हणून त्याने नाही का इंदुमतीच्या स्वयंवराचे वर्णन केले? बाई त्या इंदुमतीच्याच परपरेतील तू! तरदेखील माझे चार पावसाळे जास्त झाले होते; नयाजवळ न राहणाऱ्या बाईचे जीवन किती कठीण ह्याची जाणीव मला होता. तिच्या आत्मविश्वासाचे थोडे कौतक आणि तिच्या मुग्धपणाबद्दल थोडी करुणा वाटूनच मी विचारले लग्न मनाविरुद्ध झालं तरी नवरा जर सदगुर्णी व सुशिक्षित असेल तर त्यांचं आपलं पटत कानाही हे तरी तुम्ही निदान पहावयाच होत! कदाचित सहवासानं प्रेम उत्पन्न झालं असत! "तोही प्रयल मी करून पाहिला" ती म्हणाली. काया त्यांचा स्वभाव चमत्कारिक आहे!" मी विचारले. "छे! तसं काही नाही, ते फार सुस्वभावी आहेत, शिकलेलें आहेत" ती थोडी थांबली, नंतर मान हलवून