पान:Paripurti.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६ / परिपूर्ती
 

हाडांच्या अनुरोधाने माती उकरून संबंध सांगाडा मोकळा केला. पायाचा हाडे उघडी पडल्यापासूनच मला शंका आली होती. संबंध सागाडी दिसू लागल्याबरोबर तर शंका फिटली. “कुत्रा पाहिल्यापासून बाईचा सागाडी मिळणार म्हणून वाटतच होतं... हा घ्या मिळाला!"-- मी म्हटले. "म्हणजे? हिलाही मारून टाकली काय?" माझ्या विद्यार्थ्याने प्रश्न केला. ह्यात काय संशय? स्वर्गात जसे नोकरचाकर व इमानी कुत्रा लागतो तशा बायको नको का?" त्याच्या प्रश्नाला सांकळियांनी उत्तर दिले. पण ही बाईच कशावरून?" माझ्याकडे वळुन त्यांनी विचारले आणि मी त्यांना व इतरांना सांगाड्याची कमरेची हाडे, हाडाचा हलकेपणा, डोक्याच्या काही विशिष्ट हाडांच्या खणा यांची माहिती देऊ लागले. हे व्याख्यान संपल्यावर सर्व मंडळी उठली. “हे पहा, सांगाडा आता तुमच्या ताब्यात देतोफोटोसाठी नीट साफ करून ठेवा. अजून ऊन फार आहे, दोन तासांनी सूर्य मावळायला आला म्हणजे नीट बेताचा प्रकाश पडेल तेव्हा फाटा. आम्ही पलीकडे काम सुरू करतो, तम्हाला कोणी मदतनीस पाहिजे का! श्री.साकळिया म्हणाले मी मानेनेच नकार दिला व सर्व मंडळी निघून गेली. मी एकटीच त्या खड्ड्यात राहिले. वरून ऊन रणरण तापत होत. मी वाकून हलक्या हाताने, सांगाडा न चाळवता, हाड न हाड दाभण, चाकू व कुचला ह्यांच्या साह्याने साफ करीत होते. पंधरा हजार वर्षांनी मातीच्या पात्र बाहेर पडून त्यांना सूर्यदर्शन होत होते. बाई पुरुषाप्रमाणेच पाय मुडपून, हात छातीवर ठेवून व डोके कुशीला वळवुन पुरलेली होती; पण पुरुषाचा देह केवढा दिसत होता आणि हिच्या हाडाची जडी केवढ्याशा लहान जागेत मावली होती! शरीराची हाडे साफ करून माझे हात डोक्याकडे वळले. केवढे लहानसे डोके होते! घडणही मोठी नाजुक वाटली. तिच्या गुळगुळीत कवटीवर माझी बोटे फिरत होती व मन यंत्राप्रमाणे नोंद करीत होते; "डोक्याचा मागचा भाग बराच फुगीर आहे बरं का- आणि हे कपाळ जरा अरुदच आहे." माझा दाभण डोळ्याच्या श्वाचेतन माती उकरू लागत डोळ्याची खाच साफ झाली; “ही नाकाची हाडं, त्याखालील भोक रुदै दिसत आहेत. नाक बसकं न रुंद होतं वाटतं. गालफडाची हाड लहानच आहेत." माझे हात जबड्यापाशी पोचले. हाडांचा रंग पिवळसर-काळसर माताच्या रंगासारखाच होता. पण जबड्या वरून ब्रश फिरताच दात उघडे पडून उन्हात चकाकले. माझे हृदय धडधडत होते. जवळच्या खड्ड्यात आणि